সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, March 24, 2014

नरेंद्र मोदीनंतर आता राहुल गांधी वर्धेत!

वर्धा, वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार सागर मेघे यांच्या प्रचारार्थ दि. २८ मार्चला अ. भा. काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा स्थानिक लोक महाविद्यालयामागील जुन्या आरटीओ मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

देशात लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक घेऊन उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. त्यामुळे हा मतदारसंघ संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरला.भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकताच २० मार्चला वर्धा येथून लोकसभा प्रचाराचा शुभारंभ केला.या सभेत मोदींनी काँग्रेसच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढविला होता. परिणामी या सभेचीही चर्चा देशभरात झाली. या क्षेत्रातून भाजपाने माजी आमदार रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाèया सेवाग्राम वर्धा येथून मोदींच्या हस्ते निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाल्याने काँग्रेसला या सभेवर मात करण्यासाठी भव्य दिव्य सभा घेणे अत्यावश्क वाटू लागले होते. अखेर राहुल गांधी यांची जाहीर सभा घेण्याबाबत दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी होकार दर्शविल्याने खा. दत्ता मेघे, राज्यमंत्री रणजित कांबळे, काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सागर मेघे व काँग्रेसच्या मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. राहुल गांधी हे यापूर्वी सेवाग्राम येथे २४ जानेवारी २०१४ ला आले होते. मागील २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही खा. दत्ता मेघे यांच्या प्रचारासाठी खा. राहुल गांधी यांची ऐतिहासिक सभा झाली होती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.