हॉर्न . ओके. प्लीज
ट्रक चालकांच्या समस्या
देवनाथ गंडाटे /९९२२१२०५९९
‘करू नका घाई, घरी वाट पाहते आई’, ‘लवकर निघा, सावकाश जा, सुखरूप पोहचा’ अशा म्हणी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या फलकांवर आपण वाचतो. परंतु, मोजक्या शब्दांत गंभीर इशारा देणार्या या म्हणींकडे बरेचदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास… त्या प्रवासात सोबत असते ती काही अवजड सामानांची आणि ट्रकची… कौटुंबिक आयुष्याचा थांगपत्ता नाही… केवळ ट्रक चालवून सामानाची ने-आण करण्यातच आयुष्य गुरफटलेले… ट्रकचालकांचे दैनंदिन जीवन कसे असते, या प्रवासादरम्यान ते कुठे राहतात, काय करतात याची उत्सुकता सर्वसामान्यांना असते. या ट्रकचालकांचा हजारो किमीचा प्रवास आणि त्यांचा जीवनप्रवास अत्यंत खडतर असतो. हा प्रवास आता आमिर खानच्या सत्यमेव जयते या शो मधून दिसणार आहे.
ट्रकचालकांच्या आयुष्यात त्यांची गाडी ही अविभाज्य घटक असते. त्यांचा निवारा म्हणजे हे वाहन. मात्र या ट्रक चालकांच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्न आहेत. या समस्या जाणून घेण्यासाठी सत्यमेव जयतेचि टीम नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यत येवून गेली. ट्रकचालकांच्या विविध भावमुद्रा टिपण्यात आल्या. ट्रकचालकांचे आयुष्य, त्यांचा आहार, ट्रकचालकांचे चित्र टिपण्यात आले आहे.
मध्यंतरीच्या काळात ट्रकचालकांमधील एड्सच्या वाढत्या प्रमाणाविषयी बरीच चर्चा झाली होती. जवळपास 85 टक्के ट्रकचालकांना त्यांना होणाऱया आजाराबद्दल आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती जाणून घेण्यात आली. ट्रकवाहतुकीदरम्यान होणाऱया समस्यांची जाणीव व्हावी, असा या शो चा उद्देस्श आहे.
अनेकदा अपघात होतत. संतप्त नागरिक वाहन पेटवून देतात. मग ट्रक मालकाचे बोलणे, पोलिस केस सतराशे साठ भानगडी. आयुष्य झिजवून देखील या भानगडी दूर होत नाही.
चंद्रपूर जिल्हा तसा उद्योगिक . त्यामुळ तिथ ट्रक आणि चालकाची संख्या मोठी आहे. चिमूर येथील रमेश जाधव नावाचे व्यक्ती ट्रक चालकाची युनियन चालवीत होते. त्यांनी मालकाकडून चालकावर होणा-या अन्याय वर न्यायालयाची दारे ठोठावली होति. कालांतराने त्यांचा मलेरियाने मृत्यु झाला. जिलयात पडोली, इंदिरानगर, राजुरा, सावली तालुक्यातील किसान नगर हे ठिकाण ट्रक चालकाचे गावे आहेत. अनेक चालकांनी आर्थिक टंचाईमुळे आत्महत्या केली. अनेकजण अपघातामुळे हात पाय गमावून बसले आहेत. अनेक महिला विधवा झाल्या. काहींनी आपल्या बापाचा चेहरा देखील बघितला नाही. या समस्या कधीच वृत्तपत्रांनी लेखणीतून उचलली नाही. सत्यमेव जयतेचि टीमने चंद्रपूर जिल्ह्यातील या गावामध्ये भेटी दिल्या. सामाजिक कार्यकर्ते मोहन कोठेकर, किशोर पोतनवार यांच्या माध्यमातून हि टीम चालकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. इंदिरानगर येथे मनोरमा नावाच्या महिलेच्या झोपडीत भेट घेन्यात आली. राजुरा तालुक्यातील सुबई जवळच्या एका गावात आत्महत्याग्रस्त चालकाच्या कुटुंबाला भेट देण्यात आलि. तुटपुंजा पगार, पती महिनोमहिने परगावी। मुलाबाळांची भेट नाही. अश्या अनेक वेदना या निमित्ताने पुढे आल्या. त्यांच्या पत्नी आता हलाखीचे जीवन जगत आहे. विमा नाही, आर्थिक मदत नाहि. शासनाच्या योजना नहित.