केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूरात दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्राची सुरूवात दि. 5 मे 2018 करण्यात येणार होती. चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयातील गरीब विद्याथ्र्यांना अभिनव प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधी मिळाव्या या संकल्पनेतून ना. हंसराज अहीर यांनी 100 टक्के शिष्यवृत्ती असणारे प्रशिक्षण केंद्राची सुरूवात दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून साकार करण्यासाठी पुढाकार घेत या प्रशिक्षण केंद्राची मुहूर्तमेढ दि. 5 मे रोजी ठरली असता विधान परिषदे निवडणुक आचारसंहीतेच्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या कार्यालयातून पत्राकाद्वारे देण्यात आली आहे.
प्रशिक्षण इच्छुक ग्रामीण युवक, युवतींनी या योजनेसंदर्भात अधिक माहितीकरिता केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचे स्वीय सहायक रवि चावरे मो.नं. 9552597392/9923171698 अथवा राहुल बनकर 9422137086 यावर संपर्क साधुन आपले शैक्षणीक कागदपत्रे व आवश्यक माहितीसह केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या स्थानिक चंद्रपूर येथील कार्यालयास सादर करावे असे कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.