चंद्र्पुर शहरात युवा व्यवसायीक म्हणून ओळख असलेले पदम कुमार जैन या ४० वर्षीय व्यावसायिकाने यांनी स्वतःच्याच चारचाकी वाहनात स्वतःवर गोळ्या झाडून आत्मह्त्या केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली .पदम कुमार जैन हे चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या स्नेहनगर वार्ड गजानन मंदिर परिसरातील रहिवासी होते,काळ सायंकाळपासून ते घरी परतले नव्हते त्यामुळे आप्त परिजनांकडून त्यांचा शोध घेणे सुरु होता.मात्र त्यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीत म्हाडा कॉलनी परिसरात आढळून आला,या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पदम यांनी आत्महत्या कोणत्या कारणावरून केली याचा तपास रामनगर पोलिस करत असून शव शवविच्छेदनासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात रवाना केले आहे.या घटनेची माहिती शहरात पसरताच व्यापारी वर्गात एकच खळबळ ऊडाली आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
१५ फेब्रुवारी रोजी पुण्यात वितरण ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन मुंबई, दि. ६ : राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला असून, १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तमाशा क्षेत्रात विठाबाई नारायणगावकर यांनी केलेली प्रदीर्घ सेवा विचारात घेता त्यांच्या नावे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य सरकारतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र शासनातर्फे सन २००५ पासून तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार विविध कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना घोषित करण्यात आला आहे. गतवर्षीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार मधुकर नेराळे यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५ ...
– अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार* पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र, बांबु हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिटचे लोकार्पण आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्हायची पण आता आसाम नंतर फक्त पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार आहे. पोंभुर्णा येथे तयार होणा-या टूथपिक या पुढील काळात आपण पंच तारांकित हॉटेल्सला पुरवू शकतो. आदिवासी बहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यात टूथपिक उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातुन रोजगार निर्मीतीचे नवे दालन तयार होत आहे. पोंभुर्णा तालुक्यात विकासकामांसह रोजगार निर्मीतीच्या दृष्टीने अनेक प्रकल्प आपण राबवित आहोत. मी विकास करतो, तुम्ही सहकार्य करा असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दिनांक 21 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे आयोजित टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबु हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट च्या लोकार्पण सोहळयाच्या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पंचायत समिती पोंभु...
गडचिरोली - गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेला नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना उर्फ श्रीनिवासी मडरू हा शस्त्रास्त बनविण्यात पारंगत होता. त्याने नक्षल्यांच्या विविध दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे त्याची अटक हा नक्षल्यांसाठी मोठा हादरा आहे. दरम्यान रामन्नासह त्याची पत्नी पद्माला शनिवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गडचिरोलीसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशात नक्षल चळवळीत सेवा देणा-या रामन्ना व पद्मा या दाम्पत्याला शुक्रवारी पहाटे गडचिरोली पोलिसांच्या सूचनेनंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशहा रेल्वे स्थानकावर अटक झाली होती. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना दुपारी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रामन्ना शस्त्रास्त्र बनविण्यात आणि ते चालविण्यात पारंगत होता. त्यामुळे त्याला अनेक दलममध्ये नक्षल्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पाठविण्यात आले होते. दंडकारण्य कमिटीशिवाय त्याने कोंडागाव, माल, टिपागड, अहेरी आणि बस्तरच्या जंगलात नक्षल दलममध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे इनाम ठेवले होते....