সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, October 27, 2017

चंद्रपुरात स्वच्छता अभियानाचा फज्जा;महापालिकेला जनजागृतीची आवश्यकता

चंद्रपूर /प्रतिनिधी:
महात्मा गांधींच्या 150 व्या जन्म शताब्दीनिमित्त स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजपथ, नवी दिल्ली येथे 02 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करतांना केली.यावेळी स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी चळवळीचे स्वरुप देण्यात आले.स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना जनतेने महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन केले होते.

कोणताही उपक्रम नागरिकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दोघांचे संगनमत असणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या स्वच्छ भारत, निर्मल भारत अभियानाचा फज्जा मात्र नागरिकांच्या असहकार्याने उडाल्याचे चित्र  दिसून येतआहे. त्यामुळे स्वच्छ व सुंदर विकासाचे  स्वप्न बघण्याऱ्या चंद्रपूरात अक्षरश: घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

शहरातील सपना टॉकीज समोर मागील काही दिवसापासून रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग रस्त्यालगत दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधि पसरत घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. या ठिकाणी या आधी महानगर पालिकेकडून कचरा कुंडी ठेवण्यात आली होती. मात्र हा रस्ता अरुंद असल्याने त्या ठिकाणची कचरा कुंडी उचलण्यात आली. आणि त्या ठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना घरातला कचरा दारात येणाऱ्या घंटागाडीत टाकावे असे आवाहन देखील करण्यात आले. अन्यथा 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल असे देखील या बॅनर वर लिहिण्यात आले आहे सोबतच मार्गदर्शक फलक सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ज्यात वर्गीकरणानुसार कचरा कसा आणि कोणत्या डब्यात टाकावा हे ह्यात नमूद केले आहे. मात्र इतकी जनजागृती करून सुध्दा या स्वच्छते योजनेचा या परिसरात तीन-तेरा वाजलेले दिसून येत आहे. याठिकाणी हा कचरा असाच रस्त्याच्या मधोमध असतो. मात्र महानगरपालिका यावर मार्ग काढत पर्यायी कचरा कुंडी दुसऱ्या ठिकाणी देत या ठिकाणची दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य रोखण्यास मदत करू शकते.

या परिसरात एक टॉकीज व इतर मोठमोठे प्रतिष्ठाने देखील आहेत हाच मार्ग समोर चंद्रपूर शहरातील मुख्य रेल्वे स्टेशनला जाऊन मिळतो अशा या मार्गावर अशा प्रकारची परिस्थिती ही चंद्रपूर करांसाठी लाजीरवाणीच बाब म्हणावी लागेल.

या संपूर्ण प्रकारांवरून महानगरपालिकेला नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता चंद्रपूर महानगरपालिकेला जनजागृती विषयी मोहीम राबवण्याची आवश्यकता भासणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.