সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, October 05, 2017

मोदींना पाहिले की लोक आता टीव्ही बंद करतात’


मुंबई:-
मनसेच्या संताप मोर्चाच्या वेळी झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आणि निर्णयांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची सगळी आश्वासने विसरले. ‘अच्छे दिन’ कुठे आहेत? प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार होते ते १५ लाख रूपये कुठे आहेत? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घ भाषणांचाही उल्लेख त्यांनी केला. हल्ली टीव्ही लावला आणि भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले तर लोक आता टीव्ही बंद करतात, लोक एवढे कंटाळले आहेत. कंटाळालो म्हणून आपण रेडिओ  लावला तर तिथेही त्यांची ‘मन की बात’ सुरू असते अशीही टीका राज ठाकरेंनी केली.
गुरुवारी मुंबईत मनसेचा संताप मोर्चा निघाला तो एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीचा निषेध करण्यासाठी. राज ठाकरे जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मात्र त्यांनी मुंबईकरांच्या प्रश्नासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.