সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, October 21, 2017

दारूची तस्करी करणाऱ्या गाडीने दिली संजयला धड़क; जागीच मृत्यु

चंद्रपूर:प्रतिनिधी (ललित लांजेवार)
चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी होऊन दोन वर्षे उलटले मात्र अवैध दारू विक्री थांबायचं नाव काही दिसत नाही.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आणखी अश्याच प्रकरणातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.हि धडक एवढी भयावह होती कि त्यात संजयचा जागीच मृत्यू झाला.

संजय लोहकरे असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीवरून १९ तारखेला रात्री ११ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर मार्गाने नागपूर कडे एक चारचाकी वाहन दारू तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या नुसार स्थानिक गुन्हा शोध पथकाची टीम त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करू लागली मात्र ज्या गाडीतून दारू वाहून नेल्या जात होती त्या गाडीचा वेग इतका जास्त होता कि त्या गाडीला अडवणे स्थानिक गुन्हे शोध पथकाला जमले नाही.त्यामुळे याची माहिती त्यांनी वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला दिली.मात्र हे पोलीस स्वतः चौकीवर न जाता तेथील दारूविक्री करणाऱ्या संजय लोहकरे याला फोन करून बोलावून घेत ब्यारीगेट्स लाऊन अडविण्यास सांगितले. मात्र प्रश्न असा उपस्थित होतो कि पोलिसांचे काम करायला मधात तिसरा व्यक्ती येतोच कुठून? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून मृतकाच्या आप्तेष्ठांनी पोलिसांवर फोन करून बोलावून घेतल्या गेल्याचा आरोप केला आहे

पोलिसांच्या सांगण्यावरून खांबाडा येथील पोलीस चौकीजवळ बॅरीगेट लावून गाडी अडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्या भरधाव गाडीने बॅरीगेट सह संजय लोहकरे यांना धडक दिली व गाडी नागपूर मार्गाने निघून गेली हि धडक एवढी भयावह होती कि त्यात संजयचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती त्यांच्या आप्तजनांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून हा घातपात असल्याची ओरड सुरु केली त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते, मात्र पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी त्यांना शांत करून प्रेत शवविच्छेदना करीत उपजिल्हा रुग्णालयात पाठविले .मृतकाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपावरून पोलीस विभागावर अनेक आरोप केले जात आहेत.
गुरवारला झालेल्या या घटनेमुळे एकाला आपला जीव गमवावा लागल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे .
पोलिसांनी दिलेल्या महितीवरुण मृतक हा त्यावेळी त्या ठिकाणी होता व भरधाव असणाऱ्या वाहनाने त्याला जोरदार धड़क दिली व त्यामुळे त्याचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास मनाई केली असे सांगण्यात आले.
सदर प्रकरणाचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर करीत असून अवघ्या 24 तासात आरोपीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.