সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, October 16, 2017

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही

supriya sule साठी प्रतिमा परिणामपुणे : 1 जानेवारीपर्यंत कोपर्डी घटनेचा निकाल न लागल्यास मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य राष्ट्रीवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या.
‘कोपर्डी घटनेला दीड वर्ष होत आला मात्र अद्यापही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे आता आणखी उशीर झाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य करत हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
या प्रकरणाचा निकाल 1 वर्षाच्या आत लावला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, आतापर्यंत तरी याचा निकाल लागलेला नाही. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोपर्डीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. त्यामुळे आता या खटल्याचा निकाल नेमका कधी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.



नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले होते, “आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.