नागपूर -नरभक्षक म्हणून वनविभागाने ठार मारण्याचे आदेश दिलेल्या आणि गेल्या आठ दिवसापासून कोर्टकचेरीत अडकलेल्या वाघिणीचा आज विजेच्या तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. वर्धा जिल्ह्याच्या सिंधी तालुक्यातील बोर अभयारण्यालगत वाघिनीचा मृत देह सापडला. विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याची माहिती कळताच वन विभागाचे कर्मचारी पोहचले. घटनास्थळी वन विभागाने नरभक्षक घोषित केलेल्या आणि ठार मारण्याचे आदेश दिलेली वाघिण असण्याची शक्यता आहे. मृत्यु झालेल्या वाघिनीच्या गळ्यात कॉलर आयडी आहे. या वाघिणीच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी वन्यप्रेमी जेरील बनाइत हे दिल्लीला निघाले होते. मृत्युची बातमी कळताच वनविभागाने तिचा बळी घेतल्याचा आरोप बनाईत यांनी केला आहे.अखेर त्या वाघिणीचा मृत्यू
नागपूर -नरभक्षक म्हणून वनविभागाने ठार मारण्याचे आदेश दिलेल्या आणि गेल्या आठ दिवसापासून कोर्टकचेरीत अडकलेल्या वाघिणीचा आज विजेच्या तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. वर्धा जिल्ह्याच्या सिंधी तालुक्यातील बोर अभयारण्यालगत वाघिनीचा मृत देह सापडला. विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याची माहिती कळताच वन विभागाचे कर्मचारी पोहचले. घटनास्थळी वन विभागाने नरभक्षक घोषित केलेल्या आणि ठार मारण्याचे आदेश दिलेली वाघिण असण्याची शक्यता आहे. मृत्यु झालेल्या वाघिनीच्या गळ्यात कॉलर आयडी आहे. या वाघिणीच्या बचावासाठी सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी वन्यप्रेमी जेरील बनाइत हे दिल्लीला निघाले होते. मृत्युची बातमी कळताच वनविभागाने तिचा बळी घेतल्याचा आरोप बनाईत यांनी केला आहे.

