সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, October 02, 2017

‘इको-प्रो सायकल क्लब’ ची सुरूवात

चंद्रपूरः इको-प्रो संस्थेच्या ‘इको-प्रो सायकल क्लब’ चे आज मान्यवरांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली.
इको-प्रो चंद्रपूर जिल्हयातील पर्यावरण, वन-वन्यजीव संरक्षण तसेच सामाजीक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे. वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताह निमीत्त पहील्या दिवशी वन्यजीव संरक्षण जनजागृती पदयात्रा व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमीत्ताने इको-प्रो संस्थेच्या ‘इको-प्रो सायकल क्लब’ ची सुरूवात आज श्री मुकुल त्रिवेदी, क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर व श्री विजय शेळके, मुख्य वनसरंक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांचे हस्ते फित कापुन करण्यात आली. यावेळी श्री किशोर मानकर, उपसंचालक, कोर, ताडोबा, श्री राहुल पाटील, संचालक, बिआरटी, श्री राजीव पवार, विभागीय वनअधिकारी, श्री अशोक सोनकुसरे, विभागीय वन अधीकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपर शहर सर्वाधीक प्रदुषीत शहर आहे. सोबतच चंद्रपूर शहराची रचना आणी रस्ताची कमी आणी दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनाची संख्या यामुळे प्रदुषण टाळण्याच्या दृष्टीने, आरोग्याच्या सांभाळण्याच्या दृष्टीने ‘वाहन’ म्हणुन सायकल उत्तम पर्याय आहे. दिवसातुन काही वेळ सायकलचा वापर चंद्रपूरकर जनतेने करावा याकरीता इको-प्रो च्या वतीने लवकरच ‘‘सायकल चालवा, प्रदुषण घालवा व आरोग्य टिकवा’’ हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. याकरीता ‘इको-प्रो सायकल क्लब’ तर्फे व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. इको-प्रो च्या कार्यकत्र्यानी स्वखर्चाने जुन्या पध्दतीची आणी हिरव्या रंगाच्या एकसारख्या सायकली खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
आज या सर्व सायकल च्या माध्यमाने ‘इको-प्रो सायकल क्लब’ शंुभारभ करण्यात आले. पुढे इको-प्रो चे सर्वच सदस्य अशा सायकली घेतील, इतर चंद्रपूरकर सुध्दा या क्लबचे सदस्य होतील यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी बंडु धोतरे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी इको-प्रो संस्थेचे अनेक सदस्य याप्रंसगी उपस्थित होते यात नितीन बुरडकर, धर्मेद्र लुनावत, रवी माडावार, रविंद्र गुरनुले, विश्वजीत इंगलवार, संजय सब्बनवार, विनोद दुधनकर, सचिन धोतरे, अमोल उटट्लवार, प्रतीक बद्दलवार, आकाश घोडमारे, कपील चैधरी, अभय अमृतकर, मनीष गांवडे आदीचा समावेश होता.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.