সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 31, 2017

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता रॅली काढून केली नागरिकांमध्ये जनजागृती

चंद्रपूर -नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहास सुरुवात झाली असून आज शहरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली. या सप्ताहात 4 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली.

30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या अवधीत दक्षता विषयक जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्रीय दक्षता आयोगाने घेतला आहे. ‘मेरा लक्ष्य – भ्रष्टाचार मुक्त भारत’ अशी यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते. सप्ताहाचे आयोजन राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत करण्यात यावे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावेळी सांगितले आहे

नागरिकांना भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती  असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in  तसेच नि:शुल्क दुरध्वनी क्रमांक 1064 द्यावी , यासाठी चंद्रपूर येथील कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक देखील देण्यात आलेला आहे (०७१७२ -२५०२५१) असे हि यावेळी सांगण्यात आले नमूद आहे.

त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने शहरातील प्रमुख भागात पथनाट्याचे (Street Plays) आयोजन करण्यात आले होते.विविध शाळा कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी या रॅली मध्ये सहभागी होऊन भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना, भ्रष्टाचार प्रतिबंध संदर्भात मी काय करु शकतो? या विषयी हातात फलक घेऊन रॅली काढत शहरातील मुख्य मार्गाने नारे लावत जनजागृती केली.

शहरातही सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. या सप्ताहामध्ये शहर व जिल्ह्य़ातील सर्व शाळा, महाविद्यालये, सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी रुग्णालये तसेच मोक्याच्या ठिकाणी भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी फलक, स्टीकर्स लावण्यात आले. जिल्यातील तालुका व गाव पातळीवर देखील भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती आयोजन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.