श्रीराम पान्हेरकर, सुशीला बिजमवार, डाॅ. डी.बी. बनकर, गणेश खवसे अाणि डाॅ. अशाेक धाबेकर यांना पुरस्कार
नागपूर, दि. २९ (प्रतिनिधी) – सी. माे. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१८ चे पुरस्कार जाहीर करण्यात अाले असून येत्या १ जानेवारी राेजी नागपूर येथे हे पुरस्कार वितरीत केले जातील, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष नारायण समर्थ यांनी दिली.
दिव्यागांसाठी कार्य करणारे चंद्रपूरचे श्री. श्रीराम पान्हेरकर यांना डाॅ. गाेविंद समर्थ अपंग सेवा कार्य पुरस्कार, व्यसनमुक्ती अाणि भूदानाचे काम करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील साखरा येथील श्रीमती सुशीला बिजमवार यांना मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार, शिक्षण क्षेत्रात काम करणारे अाणि गरीब हाेतकरु विद्यार्थ्यांना वसतीगृह उपलब्ध करून देणारे नागपूरचे डाॅ. डी. बी. बनकर यांना ना. बा. सपाटे अादर्श शिक्षक पुरस्कार, पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणारे श्री. गणेश खवसे यांना सी.माे. झाडे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार अाणि अाराेग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करून सातत्याने जनजागृती करणारे डाॅ. अशाेक धाबेकर यांना डाॅ. अतुल कल्लावार अाराेग्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात अाला अाहे.
पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी पाच हजार रुपये राेख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे अाहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गिरीश गांधी, सर्वाेदयी विचारवंत अॅड. मा. म. गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत साेमवार दि. १ जानेवारी २०१८ राेजी नागपूर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार अाहे.