সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 10, 2013

पुरस्काराचे वितरण

चंद्रपूर : लोकसेवा आणि विकास संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणा-या पुरस्काराचे वितरण रविवारी  स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय येथे पार पडले. यावर्षी डॉ. देवीसिंह शेखावत, खासदार मारोतराव कोवासे, उषा तांबे, मनोहर म्हैसाळकर यांना गौरविण्यात आले.
कस्तुरबा गांधी, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार व डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख आणि वीर बाबूराव शेडमाके यांच्या नावांनी पुरस्कार दिले जातात. सार्वजनिक जीवनात कार्य करणा-या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार डॉ. देवीसिंग शेखावत, वीर बाबूराव शेडमाके पुरस्कार खासदार मारोतराव कोवासे, कस्तुरबा गांधी पुरस्कार मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना, तर कर्मवीर कन्नमवार पुरस्कार विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना देण्यात आला. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.