चंद्रपूर : उद्योग आणि कोळसा
खाणींमुळे चंद्रपूरचे तापमान वाढत असल्याचा युक्तिवाद होत असला, तरी स्वातंत्र्यपूर्व काळातही
घनदाट जंगलाच्या शहरात ४८ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली होती. शहराच्या या तापमानवाढीची
नेमकी कारणे शोधण्यासाठी नीरीने (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान, नागपूर) पुढाकार घेतला आहे.
मात्र, जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपासून निधीच न दिल्याने तापमानाचा
अभ्यास अडकला आहे.
औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने प्रगतिपथावर
असलेले चंद्रपूर शहर कडक उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध आहे. या शहराचे झपाट्याने औद्योगिकीकरण
झाल्याने व होत असल्याने येथे उन्हाळा बराच तापतो, असे अभ्यासकांचे मत आहे.
उद्योगधंदे येण्यापूर्वी या शहराच्या चौङ्केर घनदाट जंगल होते. तेव्हाही उन्हाच्या
झळा होत्या. शहरात रात्रीच्या वेळेसही तापमान कमी होत नाही. याकरिता मनीरीङ्ककडून त्यावर
संशोधन करून अहवाल मागविण्यात यावा व सुचविण्यात आलेल्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी इको-प्रोचे अध्यक्ष
बंडू धोतरे यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. त्या अनुषंगाने मनीरीङ्कने सहमती दर्शविली.
याकरिता अपेक्षित असणा-या खर्चासाठी नीरीचे कार्यकारी निदेशक डॉ. त. चक्रवर्ती यांनी
जिल्हाधिका-यांना आर्थिक स्रोत ठरविण्यासाठी पत्र दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी
काळभोर यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नीरीने पुढचे पाऊल उचलले नव्हते. आता पुन्हा
एकदा इको-प्रोने आपली मागणी रेटून धरल्याने विद्यमान जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी
निधीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिक स्तरावरील खनिज विकास निधी, जिल्हा नियोजन, आमदार निधी, स्वेच्छा निधी यापैकी एका
स्रोतांतून हा निधी नीरीला उपलब्ध झाल्यास तापमानवाढीची कारणे आणि त्यावरील उपाय अभ्यास
करून सांगण्यात येणार आहेत.
-----------------
हवामापी केंद्राभोवतीचे अतिक्रमण
हटलेच नाही
चंद्रपूर शहरातील तापमान, पावसाच्या नोंदी घेण्यासाठी
तुकूम परिसरात इंग्रजकालीन हवामापी आहे. त्यावर भारतीय हवामान खात्याच्या
नागपूर केंद्राचे नियंत्रण असते. पूर्वी ही जागा अडीच एकर होती. मात्र, अतिक्रमणामुळे या परिसरात
इमारती झाल्याने केवळ अर्धा एकरच जागा शिल्लक राहिली आहे. या अतिक्रमणामुळे तापमानाच्या
नोंदीत ङ्करक पडू लागला आहे. हे सर्व अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिका-यांना चारदा नोटीस देण्यात
आली. मात्र, कोणतीही कारवाई झालेली नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी नागपूर
येथील भारतीय हवामान खात्याचे अधिकारी डी. के. उके, एम. एल. टोके यांनी भेट दिली
होती. त्यावेळी त्यांनी १५ दिवसांत अतिक्रमण काढू, असे सांगितले होते. मात्र, दोन वर्षे लोटूनही कार्यवाही
झालेली नाही. १९८८ मध्ये हे अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी विरोध
केल्याने अतिक्रमण वाढतच गेले.
-----------
स्वयंचलित हवामापी केंद्र वा-यावर
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांतील
तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूर शहरात स्वयंचलित हवामापी केंद्र (अॅटोमेटिक
वेदर स्टेशन) उभारण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र, हे केंद्र वा-यावरच दिसून येत आहे. या
स्वयंचलित केंद्रातून हवामान,
तापमान, वर्षामापी करण्यात येणार होती. त्यासाठी
येथे प्रयोगशाळा, प्रशिक्षित कर्मचारी, वाहनांचा प्रस्ताव होता. मात्र, कुठलीही कार्यवाही झालेली
नाही.
--------------
हवामापी केंद्र स्थलांतराचा प्रस्ताव
रखडला
तुकूम येथील हवामापी केंद्र अतिक्रमणाच्या
विळख्यातून प्रशासनाने मुक्त न केल्यास पर्याय म्हणून स्थलांतर करण्याची मागणी भारतीय
हवामान विभागाने जिल्हाधिका-यांकडे केली होती. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या
समोरील बाबूपेठ येथील शीट क्र. ३१, ब्लॉक क्र. १३ भू-काट क्र. १६ ही
जागा हवामान केंद्रासाठी विभागाने नियोजित केली होती. मात्र, हा प्रश्नही अद्याप सुटलेला
नाही.