সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 18, 2013

चंद्रपुरात चेतले सामूहिक सूर्यनमस्कार महायज्ञ!



*३ हजाराच्यावर विद्याथ्र्यांचा सहभाग

चंद्रपूर, १८ फेब्रुवारी
स्वामी विवेकानंद सार्धशती समारोहानिमित्त चंद्रपुरातील विविध शाळांतल्या जवळपास ३ हजारापेक्षा जास्त विद्याथ्र्यांनी एकाच वेळी सामूहिक सूर्यनमस्कार घातले आणि हे महायज्ञ चेतले गेले. या ऐतिहासिक उपक्रमाला विद्याथ्र्यांचा लाभलेला कमालीचा उत्साह आणि त्यांची शिस्त बघून उपस्थित मान्यवरही भारावले.
स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती व शारीरिक शिक्षक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या भव्य पटांगणावर सामूहिक सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, वक्ते प्रशांत आर्वे, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार हंसराज अहिर, आमदार नाना श्यामकुळे, स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य रेखा दरबार, अश्विनी दाणी, अशोक भालेराव, रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक वसंतराव थोटे, नगर संघचालक अ‍ॅड. रवींद्र भागवत, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, रमेशचंद्र बागला, अभिषेक येरगुडे, प्राचार्य प्रदीप गर्गेलवार, अनुप पाठक, घनश्याम दरबार, पंकज अग्रवाल, राजेश नायडू, अमित उमरे, समितीचे जिल्हा संयोजक नितीन हिरूरकर, नगर संयोजक दीपक देशमुख, शारीरिक शिक्षक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष राजू वनकर, सचिव उमेश पंधरे प्रभृती उपस्थित होते.
भव्य पटांगणावर उपस्थित हजारों विद्याथ्र्यांनी एकाच वेळी मोठ्या शिस्तीत सूर्यनमस्कार घातले. यावेळी सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि त्यापासून होणारे फायदे सांगितले जात होते. सूर्यनमस्कार घातल्यानंतर मान्यवरांनी उपस्थित विद्याथ्र्यांना मागदर्शन केले.
खा. हंसराज अहिर यांनी, उत्तम शिक्षण घेत असतानाच शारीरिक शिक्षणही विद्याथ्र्यांनी घ्यावे, जेणेकरून या देशाची युवा पिठी सुद्दढ आणि बलशाली होईल, असा सल्ला विद्याथ्र्यांना दिला. तर राजेंद्र वैद्य म्हणाले, स्वामी विवेकानंद सार्धशती निमित्त आयोजित सूर्यनमस्कार महायज्ञाचे हे आयोजन विद्याथ्र्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, विद्याथ्र्यांनी केवळ आज एकदा सूर्यनमस्कार घालून थांबू नये, तर ही उत्तम सवय यापुढेही कायम ठेवावी. घनश्याम राठोड यांनीही यावेळी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, मान्यवरांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात केली. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक रवी जोगी यांनी केले. संचालन राम मोहरील यांनी, तर आभार प्रदर्शन भारती नेरलवार यांनी केले. अनंत डेहनकर यांनी वैयक्तीक गीत म्हटले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिवाकर थोटे, विजय यंगलवार, लोकेश सोरते, कपीश उजगावकर, श्रीराम देशमुख, प्रसाद घट्टूवार, राहूल ताकधर, किशोर किरमिरे, वासुदेव कोहपरे, वैभव थोटे, शुभम दयालवार तसेच स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती व शारीरिक शिक्षण शिक्षण महासंघाच्या कार्यकत्र्यांनी परीश्रम घेतले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.