সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 10, 2013

ग्राम स्वच्छतेत सोरेकसा गावाची भरारी


चंद्रपूर - जिवती तालुक्यातील सोरेकसा या आदिवासी बहुल गावाने ग्राम स्वच्छतेत भरारी घेतली असून गावातील 143 कुटूंबाने प्रत्येक घरी श्रमदानातून रस्ते, बाग, घनकचरा व्यवस्थापन तसेच शौचालय उभारुन इतर गांवाना आदर्श घालून दिला आहे. 
     495 लोकसंख्या व 143 कुटूंब असलेल्या जिवती तालुक्यातील सोरेकसा या आदिवासी बहुल व दारिद्रये रेषेखालील गावाने स्वच्छतेचा आदर्श इतर गावासमोर ठेवला आहे.  गावातील नागरीकांनी अतिशय एकोप्याने व श्रमदानातून गावाचा विकास साधला आहे.  संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत गावातील प्रत्येक घरी शौचालय उभारले आहे.  मात्र यासाठी शासनाचा कुठलाही निधी गावक-यांनी घेतला नाही.  रोगाचे व आजाराचे मुळ असलेल्या कचरा व घाणीचे नियोजन बध्द व्यवस्थापन करण्यासाठी गावक-यांनी स्वत: पुढाकार घेवून शोष खड्डे तसेच सांडपाणी व्यवस्थापन केले. 
     पर्यावरण संतुलन राखण्यासाठी गावात वृक्षारोपन केले व परसबागा निर्माण केल्या यातून गावाचे पर्यावरण तर चांगले झालेच सोबतच छोटया छोटया परसबागामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडली.  घरातील सांडपाणी नाल्याच्या माध्यमातून या झाडांना देण्यात येते.  त्यामुळे गावातील सर्व झाडे बाराही महिने हिरवी हे सगळे कार्य गावक-यांनी शासनाच्या मदतीविना व श्रमदानातून केली आहेत असे त्या गावच्या सरपंच हर्षकला महादेव मडावी यांनी सांगितले. 
     स्वच्छतेसोबतच गावाला पिण्याचे शुध्द पाणी आवश्यक असून सोरेकसा गावात शुध्द पाणी मिळते.  विशेष म्हणजे या गावातील नागरीकांत अतिशय सामजश्याचे  नाते असून गावात भांडण तर सोडाच पोलीस केस सुध्दा झाली नाही. हे या गावचे मुख्य वैशिष्टय आहे.  शासनाच्या योजना गावात पिण्यासाठी गृहकर व पाणी पट्टी वसुली महत्वाची असते.  सोरेकसा गावात प्रत्येक नागरीक नियमित गृहकर व पाणी पट्टी भरत असून या गावची वसुली 100 टक्के आहे.
     शेती व शेत मजूरी असा व्यवसाय असलेल्या सोरेकसा गावात तीन महिला बचत गट असून विशेष म्हणजे या गावाच्या संरपच सुध्दा महिलाच आहे. या गावचे आणखी वैशिष्टय म्हणजे गावात एकही मुल कुपोषित नाही.  अशा गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या समितीने भेट देवून या गावाचे जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारासाठी निवड केली आहे.  या गावाला विकासासाठी ग्राम विकास अधिकारी विश्वास सलामे व सचिव प्रकाश बोरचारे यांचे सातत्याने मार्गदर्शन असते. गावातील नागरीकांनी ठरविले तर गावाचा कसा काया पालट होवू शकतो. याचे उत्तम उदाहरण सोरेकसा गावाकडे पहावे लागेल. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.