সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 25, 2013

सर्व पक्षीय आंदोलनात दोन गट


गोंडपिपरी-  महाराष्ट्र-आंध्रप्रदेशच्या सिमेवरील प्राणहिता नदीवर आंध्र सरकार ४०३०० कोटी रुपयांचे महाधरण बांधत आहेत्यामुळे तेलंगाना प्रांत सुजलाम सुङ्कलाम होईलमात्रत्याचा ङ्कटका चंद्रपूरगडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना बसणार आहेया महाधरणाचा विरोध करण्यासाठी सोमवारी (ता२५गोंडqपपरी तहसील कार्यालयासमोर शिवणीनंदवर्धन,पानोरा येथील शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलेआज झालेले आंदोलन हे कुठल्याच पक्षाचे नसूनसर्वपक्षीय असल्याचा दावा आयोजकांनी केला होताया दृष्टीने शिवणी,नंदवर्धनपानोरा या गावातील नागरिक व तालुक्यातील इतर पक्षाचे पदाधिकाèयांची नावे टाकण्यात आली होतीमात्रया आंदोलनात या तिन्ही गावातील अनेकांच्या अनुपस्थितीने सर्वपक्षीय आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात अनेक मोठ्या नद्या वाहतात. मात्र, राज्य सरकारला त्याचा ङ्कायदा करून घेता आला नाही. उलट प्राणहिता नदीतील पाण्यातून आध्रप्रंदेश तेलंगाना प्रांताला सुजमाम सुङ्कलाम करण्यासाठी महाधरण बांधत आहे. त्यामुळे हैद्राबाद शहराला पिण्याचे पाणी उपबल्ध होईल. दुसरीकडे या महाधरणामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांना होणार आहे. त्यामुळे शिवणी, नंदवर्धन, पानोरा येथील संतप्त शेकडो नागरिकांनी आज गोंडqपपरीच्या तहसील कार्यालयासमोर एकत्र आले. त्याच ठिकाणी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ठिय्या आंदोलन केले. आमदार शोभाताई ङ्कडणवीस यांच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी सरकार व जलसंपदाच्या अधिकाèयांवर टिका केली. या महाधरणाने आपले होणारे नुकसान रोखण्यासाठी आता पूर्ण ताकतीनिशीा लढा देणार असल्याच्या त्या म्हणाल्या. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून,टप्प्याटप्याने हे आंदोलन तिव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा नदीच्या पाण्याचा वापर पश्चिम महाराष्ट्राने करावा,त्याबदल्यात विदर्भातील नद्यांचे पाणी आंध्राला देण्याचा हा डाव असल्याचे त्या म्हणाल्या.

निमकरांविरोधीही संताप
२००८ मध्ये चेवेल्ला महाधरणाचे प्राणहिता नदीलगत तुमडीहेटी येथे प्रस्थावित स्थळावर चेवल्ला
महाधरणाचे भूमिपूजन झाले होतेयावेळी राजूरा विधानसभेचे माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थित होतेया मुद्यावरून मोठा गाजावाजा झाला होताआजच्या आंदोलनाच्या वेळी निमकरांचा हा मुद्दा समोर आल्याने त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात जाल तर खबरदार
गोंडपिपरी येथे झालेल्या आजच्या आंदोलनाला दडपण्यासाठी जलसंपदाचे अधिकारी काही दिवसापासून कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार ङ्कडणवीस यांनी केलातुम्ही जर आंदोलनात जाल तर खबरदारतुम्हाला मोबदल्यापासून वंचित राहावे लागेलअसा दम या अधिकाèयांनी गावकèयांना दिल्याचा आरोप ङ्कडणवीस यांनी केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.