সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 18, 2013

खेडी येथे बोरवेलचे काम अर्धवट करून कंत्राटदार पसार

सावली - तालुक्यातील खेडी येथे आमदार अतुल देशकर यांचे निधींतर्गत मंजुर बोरवेलचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने गावकÚयांनी अडविल्यामुळे अध्र्यावर सोडुन गाडी परत गेली.
        सावली तालुक्यातील खेडी येथे ब्रम्हपुरी निर्वाचन श्रेत्राचे आमदार अतुल देशकर यांचे स्थानिक निधीमधुन स्मशानभुमीत बोरवेलचे काम मंजुर झाले. दिवसभरात गाडी येणार म्हणुन सरपंचासहीत ग्रापंचायत पदाधिकारी वाट पहात
होते. परंतु पि. आर. बोरवेल्सची गाडी मात्र रात्रो 8 वाजताचे सुमारास आली. बोरवेल्सचे काम सुरू करण्यात आले परंतु याकरीता वापरण्यात येणारे पाईप निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे सरपंच परशुराम मर्लावार, उपसरपंच प्रविण गावडे, ग्रा.पं.सदस्य विजय कोरेवार,  शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष मारोती कंकलवार,विकास कटकमवार, सुनिल मंगाम, सोमा ओगुवार, सुकरू कंचावार, पुरूषोतम नेरडवार यांनी अंदाजपत्रकानुसार पाईप टाकण्यास सांगुन काम बंद केले. याबाबत फोनवर कंत्राटदारासोबत बोलणे झाले असता सकाळी चांगले पाईप टाकुन देण्याचे मान्य केले परंतु त्याठिकाणी कोणीच नसल्याचे पाहुन काम अर्धवट सोडुन रात्रोच गाडीसह पसार झाले. त्यामुळे चांगले पाईप टाकुन बोरवेल्सचे काम करावे अशी मागणी गावकÚयांनी केली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.