সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 07, 2013

वर्ध्याजवळ अपघातात पाच ठार

वर्धा- भरधाव ट्रक आणि झायलो कारची समोरासमोर धडक झाली. नागपूर घाटंजी मार्गावरील शिरपूर भिडीजवळ झालेल्या या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. आकाश गिरी (२०), अमोल झाडे (२६), सुमीत कांबळे (२५), अजय कुमरे (२८), राहुल फुसे (२२) ही मरण पावलेल्यांची नावे आहेत. फुसे याने नवी इंडिका (एम.एच २९/एडी २१७३) खरेदी केली. आपल्या चार मित्रांसह तो नागपूर येथे आला होता. परतीच्या प्रवासात शिरपूर भिडीजवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकने (एम.एच २६/एच ६१७२) कारला धडक दिली. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.