সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 17, 2013

महिलांचा सत्तेतील सहभाग तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा-खा. सुप्रिया सुळे

 महिलांचा सत्तेतील सहभाग तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा-खा. सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यास महिलांचा उदंड प्रतिसाद
qसदेवाही, दि.१७ (प्रतिनिधी):
महिलांचा सत्तेतील सहभाग हा समाजातील तळागाळातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महत्त्वाचा ठरला असून त्यातून संपन्न आणि समृद्धीची नवी कृतीशील जाणीव निर्माण झाली आहे. सत्ताकारणातील निर्णय प्रक्रीयेतील सहभाग महिलांच्या वैचारिक अधिष्ठानाचे नवे पर्व ठरले आहे, असे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
qसदेवाही येथील सर्वोेदय महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीच्या महिला मेळाव्याला खा. सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला १५ हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्या. खा.सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, देशाच्या विकासात्मक वाटचालीत महिलांच्या कर्तृत्त्वाचा अग्रक्रमाने विचार केला जात आहे, हे अभिमानास्पद आहे. संघटीतपणातून आपले हक्क, प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सक्षमीकरणाचा प्रभावी वापर केला आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण आज वाढले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणातही त्यांनी आघाडी घेतली आहे. कर्तृत्त्वाची यशोशिखरे ती qजकत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच जबाबदारी व प्रामाणिकपणे जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, याची प्रचिती मला गावोगावी महिलांशी संवाद साधतांना येत आहे. महिलांनी आज आपल्या स्वयंभू विचाराचा उपयोग मतदानाच्या माध्यमातून करावा. संघटीतपणातून विकास साधता येतो. यावर महिलांचा विेशास आहे, हे नाकारुन चालणार नाही. २१व्या शतकातील सर्वच क्षेत्रातील वास्तववादी आव्हानांचा स्विकार करण्यासाठी महिलांनी सज्ज व्हावे. महिला बचत गट हे अर्थकारणाचा समर्थ पर्याय त्यांना मिळाला असून त्यामाध्यमातून समृद्धीचा कृतीशील विकासात आपल्या भगिनींनी सामावून घ्यावे व त्यांच्या भल्याचा विचार करावा. मेळघाटातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न मी जाणून घेतले असून ते सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील अनेक नोकरीच्या संधी युवती व महिलांना देण्याबरोबरच qसचनाखाली आलेल्या जमिनी मालकांना न्याय देण्यासाठी मी शासन पातळीवर प्रयत्न करेन.
 मा.ना. बबनराव पाचपुते म्हणाले की, महिलांनी हाती आलेल्या सत्ताकारणाचा उपयोग हा जनतेशी मूलभूत प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी केला आहे, हे आपण सर्वांनी मान्य केले आहे. उत्कृष्ट प्रशासन आणि अधिकारांचा प्रभावी वापर करण्याची अभ्यासू शैली महिलांमध्येच उपजत असते. कुटुंबाची सेवा करणारी माऊली देशाच्या सत्तेचा सांभाळ ही तितक्याच जबाबदारीने आणि सामूहिक विचारातून करत आहे, हे तिने सिद्ध केले आहे. समाजातील विघातक शक्तीचा नायनाट करण्यासाठी पुरुषांनीही तिला साथ देण्याची गरज आहे.
 मा.ना. अनिल देशमुख म्हणाले की, महिलांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्यात जाऊन समस्या जाणून घेण्यासाठी मा.खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रगतीशील विचारांची चळवळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचा सहभाग हा हाती आलेल्या संधीचे लोकाभिमुख विकासात कसे रुपांतर करता येते याचा आदर्श वस्तुपाठ आहे. शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे रेशqनगचे परवाने महिला बचत गटांना दिले जात असून अन्नधान्याचा अत्यंत विेशासार्हतेने पुरवठा करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. येथून पुढेही शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यात येणार आहे.मा.ना. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, महिलांच्या कल्याणाचा विचार घेऊन मा.ना. शरद पवार यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला आणि त्याला मूर्तरुपात आणून महिलांना उत्कर्षाची नवी दिशा दिली आहे. आई जगाला प्रेरणेचा आणि सेवेचा संदेश देते आणि जगाला उद्धारत असते. महिला मेळावा म्हणजे qजकण्याची लढाई असून भविष्याचा वेघ घेण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे.
मा.ना. फौजिया खान म्हणाल्या की, महिलांचे प्रश्न हे समाजाच्या मानसिकतेशी व समाजरचनेशी जोडलेले असतात. तीच समाजाची मानसिकता बदलण्याचे काम महिलांच्या संघटीत प्रयत्नातून निश्चित होऊ शकेल. त्यासाठी त्यांनी सशक्त आणि प्रबळ होण्याची गरज आहे. शिक्षण आरोग्य विषयक प्रश्नांविषयी जागरुकता आणि अत्याचाराचा प्रतिबंध यावर महिलांनी लक्ष द्यावे व शासनाच्या योजनांचा अधिकारवाणीने लाभ घ्यावा.
मा.आ. विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, लोकसंख्या वाढीमुळे समाजातील प्रश्नांची समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी प्रबोधनात्मक विचार रुजवण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण हा प्रभावी मार्ग असून त्यातून प्रश्नांची सोडवणूकहोऊ शकते. स्त्री-भ्रुण हत्या, हुंडाबंदी, महिलांच्या महिलांच्या अधिकाराची जाणीव याविषयी विचारमंथन होणे व त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. महिलांनी ‘शिका व संघटीत व्हाङ्क हा विचार आपल्यात रुजवावा व हक्कांसाठी जागरुक रहावे.मा.सौ. सुरेखाताई ठाकरे म्हणाल्या की, समाजातील दाहक प्रश्नांचे स्वरुप जाणून घेऊन त्यावर निश्चित तोडगा काढण्यासाठी विकासाची वाट शेवटच्या तळागाळातील भगिनी पर्यंत नेण्यासाठी मा.खा. सुप्रिया सुळे यांनी महिला मेळाव्याच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून चळवळ उभारली आहे. सामान्य माणूस हा केंद्रqबदू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शेतकरी व दुर्बल घटकांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर युवती व महिला अशा अर्धीशक्तीच्या हक्कांसाठी ही जाणीव यात्रा आहे. त्यातून सर्वांना न्याय मिळवून देण्याचे धोरणाचाच हा भाग आहे, असेही सौ. ठाकरे म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील काही पदाधिकाèयांनी मनोगते व्यक्त केलीत. त्यात राजेंद्र वैद्य, संदिप गड्डमवार, सौ.संचिता मेश्राम, सौ. ज्योती रंगारी, सौ. संगिता आगलावे, सौ. शहजादी अन्सारी, सौ. लता ठाकरे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सौ. अनुराधाताई जोशी म्हणााल्या की,‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारीङ्क या न्यायाने तिने आज जगाला आपल्या कर्तृत्त्वाने नवा विचार कृतीतून दिला आहे. स्त्री वर्गाला उभारी देण्याचे काम समाजसुधारकांनी केले आहे. त्यात मा.ना. शरद पवार यांचे कार्य काळाच्या पुढचे आहे, त्यांचे विचार आपल्याला दिशा देणारे आहे. चंद्रपूरमध्ये पक्षाला कार्यालय हवे आहे औद्योगिक क्षेत्रात महिलांना संधी मिळावी व बेरोजगारी कमी करावी. ग्रामीण व शहरी रुग्णालयात उपचारासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महिलांचे विविध विषय शासनाच्या माध्यमातून तातडीने सुटावेत व काही कायदे नव्याने दुरुस्त करावे याकरीता सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. त्याचे वाचन सौ. कनिजा शेख यांनी केले. (या बातमीसोबत ठरावाची प्रतही आपणास ई-मेल करीत आहोत). या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सुषमा वानखेडे यांनी केले. महिला मेळाव्याच्या आधी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात हुंडा विरोधी नाटीका, पथनाट्य इत्यादी सादर करण्यात आले. त्याला महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास मा.ना. बबनराव, मा.ना. अनिल देशमुख, मा.ना. लक्ष्मणराव ढोबळे, मा.ना. फौजिया खान, मा.खा.सुप्रियाताई सुळे, मा.आ.विद्याताई चव्हाण, मा.सौ. सुरेखाताई ठाकरे, राजेंद्र वैद्य, संदिप गड्डमवार, विेशास ठाकूर, रमेश बंग, सौ. वैशाली नागवडे, सौ. शोभाताई पोटदुखे यांच्यासह सुमारे १५ हजार महिला उपस्थित होत्या.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.