नागपूर/ प्रतिनिधी:
विदर्भातील अनेक ऐतिहासिक मोडी लिपीतील दस्तावेज वाचता यावेत, यासाठी नागपूर येथे मोडी लिपी अक्षर ओळख ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
रविवार, दिनांक 6 जानेवारी ला 11 ते 2 यावेळेत आंबेडकर काॅलेज, दीक्षाभूमी, नागपूर येथे ही कार्यशाळा होइल.
महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाचा वारसा जपणा-या मोडीलिपीरूपाने अस्तित्वात असलेले साहित्य लिहता व वाचता यावे, यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती मोडी लिपी अभ्यासक नविनकुमार माळी यांनी दिली.
मोडी लिपी ही देवनागरीची शीघ्र लिपी आहे. अगदी स्वातंत्र्य काळापर्यंतचा सर्व व्यवहार व कागदपत्रे मोडीतून असल्यामुळे मोडीत बराच इतिहास दडलेला आहे. तो जगासमोर आणण्यासाठी या कार्यशाळेचा लाभ होइल.
अधिक माहिती नोंदणीसाठी
8830555199 या क्रमांकावर संपर्क साधावा.