जुन्नर /आनंद कांबळे:
जुन्नर नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे व राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नगरसेविका समीना अकिल शेख यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नगरसेविका समीना शेख यांनी पक्षादेश डावलुन महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या सभापती पदासाठी केलेल्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी केला होता.
सदर निवडणुकीत गटनेते दिनेश दुबे यांनी माझ्यावरचे केलेले आरोप खोटे असून ते मला मान्य नाही त्याबद्दल त्यांचेवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नगरसेविका समीना शेख यांनी निवेदनाद्वारे सांगितले. गटनेते दिनेश दुबे यांच्याकडुन या निवडणुकिसाठी मला कोणत्याही प्रकारचा पक्षादेश देण्यात आलेला नव्हता.दुबे हे एकतर्फी काम करत असतात .राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल बेनके यांची लढाई आमदार शरद सोनवणे यांच्या बरोबर असताना आपण नगरपालिकेत मनसेच्या आघाडीबरोबर युती करण्याची नाही अशी भूमिका घेतली परंतु दुबे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संपुर्ण पक्षाला वेठीस धरून चुकीचा पायंडा पाडला.माझी निष्ठा आजही अतुल बेनके यांच्यासमवेत आहे.
दुबे माझी बदनामी करण्याचे षडयंत्र करत आहेत.माझे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी दुबे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील केल्याचे सांगितले आहे.जर माझे पद कायम राहिले तर दुबे यांनी सद्सद्विवेक बुद्धीने नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन समीना शेख यांनी केले आहे.