- शेतीची अनिश्चितता मिळेल ते काम करण्यावर भर
- युवकांचा रोजगारासाठी शहरांकडे वाढतोय कल
खबरबात/धुळे, गणेश जैन
बळसाणे : उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे पुर्वजनांकडून ऐकायला मिळायचे त्याचप्रमाणे खेड्यांकडे चला असे राष्ट्र पिता महात्मा गांधींचे म्हणणे होते परंतु सध्या खते , बियाणे , मजूरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर आकाशाला पोहचल्याने त्यामानाने शेतीमालाचे दर पूर्णतः गडगडले आहेत यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर युवा पिढी चा भरवसा राहिला नाही अश्या स्थितीत माळमाथा भागात निर्माण होत असून तरुणांचा मिळेल ते काम करण्याकडे कल वाढला आहे
एकीकडे रासायनिक खते , बियाणे , औषधे यांच्या दरात होणारी वाढ शेतातील नुकसानीमुळे मजूरांना मिळणारी अपुरी मजूरी तसेच या स्थलांतराने कमी मनुष्यबळामुळे शेतीकामाकरिता मजूरांचा तुटवडा अधूनमधून ओढवणारी आस्मानी संकटे व दुसरीकडे शेतात राबराबवून मोठ्या कष्टाने पीकवलेल्या मालाचे नियमितपणे होणारी घसरण यामुळे शेतकऱ्यांचे व विशेष म्हणजे तरुण पिढींचे मनोधैर्य खचत असल्याचे परिसरात दिसून येत आहे याकाणानेच सध्याची युवा पिढी स्वतः ची शेती करणे सोडून व कोणी तर चक्क शेती विकण्याचाच निर्णय घेऊन गावाबाहेर पुणे , औरंगाबाद , नासिक , मुंबई व गुजरात , मध्यप्रदेश राज्यात जाऊन स्थायिक होत दिन जावे पगार मिळावे असे म्हणत मिळेल ते काम अगदी कमी मोबदल्यात का होईना पण बिन भांडवली धंदा करण्यात च धन्यता मानत आहेत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल दाम मिळत आहे *रात्रीचा दिवस करत उन्हातान्हात काबाडकष्ट करून देखील आणलेले पीके बाजारात अल्पदराने विकले जाते आहे त्यावर लागलेले खर्च ही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांमधून आपसात चर्चा होत आहे भांडवली खर्च तर सोडाच साधा तोडणीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे यामुळे शेतकऱ्यांनी आपली उभी पीके सोडून दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे एकूणच सगळ्या बाजूने शेतीची पडझड झाल्याने अनिश्चित च युवा पेढी शेतीकडे कानडोळा करीत होते शेती काम सोडून नोकरी व व्यवसायात पसंती करीत आहेत.