कारंजा-घा/उमेश तिवारी:
कारंजा तालुक्यात रात्री आलेल्या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे भारी नुकसान झालेले आहे. काजळी,रहाटी,जोगा, नागाझरी,धानोली,मेटंहिरजी येथे वादळी पाऊसासह गारपीट झाली. त्यामुंळे शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेतात त्यामध्ये गहु,चना, सत्रा, भाजीपाला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जातात. गारपीट व वादळी पावसामुळे गहु मोठ्या प्रमाणात झोपला आहे. शेतक-याना सत्रा या पिकाचा खुप आधार असतो पण गारपीट चा मार बसल्यामुळे सत्रा पिकाचे नुकसान झाले.
मागल्या वर्षी सुद्धा गारपीट मुळे शेतक-याना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागला. सतत यावर्षी सुध्दा शेतक-याना गारपीटचा सामना करावा लागला त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. काजळी,रहाटी,जोगा, नागाझरी,धानोली,मेटंहिरजी येथील शेतक-याची मागणी आहे कि, शाषणाने सदर पिकाचे सर्वे करुन तातडीची नुकसान भरपाई शाषणाने द्यावी अशी मागणी या भागातील युवा शेतकरी लीलाधर दिग्रसे आणि शेतकरी करत आहे.