खापरखेडा/प्रतिनिधी:
राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपूलावर जाण्यासाठी वेकोली कर्मचाऱ्यांची बस वळण घेत असताना भरधाव वेगाने वाकी दरबारातून दर्शन घेऊन नागपूर कडे जाणाऱ्या टवेरा कारने जोरदार धडक दिल्याने टवेरा गाडीत बसलेल्या 2 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर इतर 7 जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6.30 सुमारास दहेगाव रंगारी राष्ट्रीय महामार्ग परिसरात घडली.
मोहम्मद रफिक मोहम्मद शफीक अन्सारी वय 18 व शेख नूर मोहम्मद शेख रहीम वय 18 दोघेही राहणार यशोधरा नगर नागपूर अशी मृतांची नावे असून इरफान हबिबल्लाह अन्सारी वय 15, मोहम्मद रईस मोहम्मद सईद अन्सारी वय 20, रियाजुद्दीन अन्सारी सलाउद्दिन अन्सारी वय 16, शमीम आखतर शफीक अहमद वय 18, ग्यासुदिन अन्सारी सलाउद्दिन अन्सारी वय 18, शेख आसिफ शेख अजीज वय 24, बाबू उर्फ शोहेब अन्सारी वय 17 सर्व राहणार यशोधरा नगर नागपूर अशी गंभीर जखमींची नावे आहेत वाकी दरबारात दर्शन व गुरुवारी रात्री कव्वालीचा कार्यक्रन बघण्यासाठी सर्व मित्र वाकीला टवेरा कार क्रमांक एमएच-12-जीझेड-1393 गेले होते.
या 7 जनावर शासकीय रुग्णालय नागपूर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे खापरखेडा पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून बसचालक फरार आहे खापरखेडा पोलीस पुढील तपास करीत आहे.