সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 25, 2019

संविधानाने भारतीय लोकशाही सक्षम

khabarbat.in

khabarbat.in

- एड महेंद्र गोस्वामी यांचे प्रतिपादन

पवनी- डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या पवनी तालुक्यातील मौजा शेडी- सोमनाळा येथे दिनांक 21व 22 जानेवारी ला दोन दिवसीय भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी खासदार मधूभाऊ कुकडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी,शैलेश मयूर, विकास राऊत, महेंद्र गडकरी, दामोधर वाढवे,विजय सावरबांधे, लोमेश वैद्य, शंकर तेलमासरे,तोमेश्वर पंचभाई, बंडू ढेंगरे, मनोरमाबाई जांभुळे,हंसाताई खोब्रागडे, डूलाताई नखाते, व्यंकटजी नखाते, रूषी पाऊलझगडे,चरणदास शेंडे, उदारामजी खोब्रागडे ,संजीव भांबोरे उपस्थित होते.

या भीम मेळाव्यात बोलताना माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास विषद करून भारतीय संविधानाने भारतीय लोकशाहीला बळकटी देवून लोकशाही समृध्द व सक्षम केली, असे मोलाचे मार्गदर्शन केले. 

यावेळी महेंद्र गडकरी, विकास राऊत, दामोधर वाढवे, शैलेश मयूर,संजीव भांबोरे ,मनोरमाबाई जांभुळे यांनी देखील मार्गदर्शन केले. 

मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील खासदार मधूभाऊ कुकडे यांनी या भीम मेळाव्याचे कौतुक करून आपण या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. 

या मेळाव्याचे उद्घाटन खासदार मधूभाऊ कुकडे यांच्या हस्ते  ध्वजारोहण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भंतेजीच्या वतीने बुद्ध वंदना देण्यात आली. 

या कार्यक्रमाचे संचालन मधुकर मेश्राम गुरूजी यांनी केले. तर प्रास्ताविक बालकदास खोब्रागडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपस्थित होते.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.