সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 30, 2015

महीलांनी केला दारूमुक्ती निर्धार -

 महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी दारूमुक्तीची शपथ

सावली - महात्मा गाधी यांचे पुण्यतिथीदिनी श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांनी दारूबंदी करणा-या पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार व महाराष्ट शासनाचे आभार मानित दारूबंदीनंतर दारूमुक्तीसाठी शपथ घेत दारूमुक्तीचा निर्धार जल्लोषात केला
व्ंा राष्टसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानांतर्गत 5 वर्षापासुन चंद्रपूर जिल्हा दारूबंदीची मागणी लावुन धरली. दारूबंदी अभियानाची सुरवात करतांना मोझरी येथील तुकडोजी महाराज यांचे समाधीसमोर महिलांनी दारूबंदीची शपथ घेतली होती. त्यानंतर महिलांचे अनेक लढे झालीत. चिमुर ते नागपूर पदयात्रा, जेल सत्याग्रह, मुंडन आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. निवडणुकीचे काळात दारूबंदीचे आश्वासन देणा-या उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांना निवडुन आणण्यासाठी चंग बांधला. या महीलांच्या लढयाची दखल घेत महाराष्ट शासनाने नुकतेच दारूबंदी घोषीत केली. दारूबंदी झाल्यानंतर अवेदय दारूविक्री वाढेल, दारूडयांची संख्या वाढणार अशी शंका व्यक्त केल्या जात आहे त्यामुळे अवैदय दारूमुक्तीसाठीही आम्ही सज्ज आहोत हे हजारो महीलांच्या संख्येने दिसुन आले. यावेळी ज्योतीबा फुले चैकातुन ते खादी भंडार कार्यालयात रॅली काढण्यात आली. गांधीजीचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्ष गांधीवादी जेष्ठ सामाजीक कार्यकत्र्या लिलाताई चितळे होत्या. त्यांनी चंद्रपुरातील महिला हया रणरागीनी असुन सर्व महिलांना क्रांतीकारी सलाम केला व दारूबंदीचे बाबतीत नागपर, मुंबई, दिल्ली येथिल न्यायालयात बाजु मांडायची असल्यास नागपूरच्या महिला हया बार असोशिएनच्या माध्यमातुन पाठिशी राहणार असल्याचे सांगीतले. महात्मा गांधी हे दारूबंदीच्या बाजुन होते व त्याचे वास्तव्याचे ठिकाणी आपण दारूमुक्तीची शपथ घेतली आहे ही खरी श्रध्दांजली आहे. अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्हयात अवैैदय मार्गाने दारू न यावी याकरीता महीलांनी, युवकांनी सज्ज असावे असे आव्हाहन केले. दारू दुकानदार कोर्टात जातील परंतू महिलांच्या बाजुनेच निर्णय येणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला. दारू पिणा-या व्यक्तीला महीलानी व युवकांनी त्याचे उपचाराकरीता सहकार्य करावे. प्रत्येक पक्षात जसे वाईट लोक असतात तसेच सुधिरभाउ मुनगंटीवार यासारखे चांगले व्यक्ती असतात असे सांगुन त्यांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे आभार मानले. यावेळी उपस्थित सर्वानी हात पुढे करून दारूमुक्तीची शपथ निर्धार केला. यावेळी अनेक महिलांनी नाचत आंनद साजरा केला.
कार्यक्रमात माजी न्यायमुर्ती मिरा खडतकर, चित्रा तुर, मंदाताई देसाई, प्रा. विमल गाडेकर, कल्याणीताई बुटी, हिराताई बावनकर, सरपंच अतुल लेनगुरे, विजय सिध्दावार, ए.आर. दुधे, प्रभाकर गाडेवार, शोभा वाढई, नामपल्लीवार, या मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कोरेवार, संचालन किरण शेंडे यांनी तर आभार अनिल मडावी यानी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता भास्कर आभारे, राजु कंचावार, कुंदा गेडाम, ज्योती राउत, व इतर कार्यकत्र्यांनी सहकार्य केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.