সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 02, 2015

‘नायलाॅन’ मांजाचा वापर टाळा

पक्षी आणि मनुष्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी नायलाॅन मांजावर बंदी आणण्याची गरज - बंडु धोतरे

नायलाॅन धागा अत्यंत मजबुत असल्याने हे सर्व प्रकार होतात. पतंगत्सोवमुळे असंख्य पक्षी दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात. जिकडे-तिकडे या धाग्यांचे जाळे झाडावर व तारांवर लटकलेले असतात. याबाबत सर्वच नागरीकांनी जागृतपणे या नायलाॅन मांजाचा वापर टाळणे तसेच आपल्या मुलांना या मांजा वापरापासुन परावृत्त करणे तसेच सर्वच शाळकरी विदयाथ्र्यामध्ये सुध्दा शिक्षकांनी याबाबत जागृती करणे गरजेचे आहे. सर्व बाल-गोपाल व चंद्रपूरकरांनी पतंगोत्सवाकरिता चायनिज-नायलाॅन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी केले आहे.


मकर सक्रांत आली की लहानापासुन मोठयापर्यत सर्वच हौशीने पतंग उडवीत असतात. या पतंग उत्सवात सर्वच सहभागी होऊन आंनद लुटत असतात. पतंग उत्सव आनंदाचा भाग मानला तरी या उत्सवासाठी वापरला जाणारा मांजा पक्षी व इतर सजिवांसाठी जिवघेणा ठरत असेल तर अशा आंनदाचा काय उपयोग?

पुर्वी सर्व प्रकारचे मांजे तयार केले जात असत, त्याकरिता वेग-वेगळे धागे यायचे. परंतु, अलिकडे मांजा तयार करून पतंगोत्सव साजरा करतांना कुणीच दिसत नाही. पतंग बाजारात रेडीमेड तयार मांजाने आपले पाय मोठया प्रमाणात पसरले आहे. आधी रेडीमेड मध्ये ‘बरेली’ मांजाच येत असे परंतु, आता सर्वत्र चायनिज नायलाॅन मांजाची धुम आहे. या नायलाॅन मांजामुळे झाडावर, तारांवर मांजा तुटल्यानंतर तसाच राहुन जातो यात पक्षी फसतात आणि मरतात. कित्येकदा वाहनस्वार रस्त्यांने धागा न दिसल्याने सुध्दा गंभीर दुखापत तसेच प्रसंगी मृत्यु सुध्दा झालेला आहे. विदयुत तारेवरची पतंग काढतांना सुध्दा जिव गमवावे लागलेले आहे.

सदर

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.