चंद्रपूर, -देशात लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका मोलाची असते, असे प्रतिपादन केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास, बंडू लडके, बबन बांगडे व विनोदसिंह ठाकूर उपस्थित होते.यावेळी मोहनलाल शर्मा यांना बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, अर्चना घोडेस्वार यांना लोकमान्य टिळक पुरस्कार, शकुंतलाबाई बांठिया यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन हंसराज अहिर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आशीष देव, दीपक देशपांडे, सुदर्शन बारापात्रे यांचा सन्मान करण्यात आला, तर विविध वार्ता पुरस्कारांसाठी रवींद्र बोकारे, रविकांत वरारकर, साईनाथ कुचनकर व सचिन रायपुरे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. उमाकांत धोटे यांनी केले. संचालन मोरेश्वर राखुंडे यांनी, तर आभारप्रदर्शन नारायण महावादीवार यांनी केले.
लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : अहिर