चंद्रपूर, वन्यप्राण्यांची शिकार करून मांस खाणार्या दोन शिकार्यांना अटक करण्यात आली आहे. शिकार्यांकडून बंदूक, कुर्हाड, सुरी व सांगाडे जप्त करण्यात आले असून, ही कारवाई सावली वनविभागाने केली. आरोपींमध्ये शामराव हिरामन मोटघरे (रा. आकापूर) व अन्य एका साथीदाराचा समावेश आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी माहितीच्या आधारे श्यामराव मोटघरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने एका साथीदाराच्या मदतीने वन्यप्राण्यांची शिकार केल्याची कबुली दिली. आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडून बंदूक, कुर्हाड, सांगाडा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांची शिकार थांबविण्यासाठी सावली वनविभागाने कंबर कसली असून, वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, सहायक क्षेत्र अधिकारी येलकेवाड, व्ही. पी. रामटेके यांनी अवैध उत्खनन, वृक्षतोड करणार्यांचे कंबरडेच मोडले आहे. रूजू झाल्यापासून त्यांनी चितळाची शिकारीचे प्रकरण उघडकीस आणून अवैध उत्खननातील जेसीबी मशीनही जप्त केली आहे.