সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 13, 2015

बंडू धोतरे राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित

चंद्रपूर - येथील इको-प्रोचे अध्यक्ष  बंडू धोतरे यांना केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित करण्यात आले.
आसामची राजधानी गुवाहाटी येथील नेहरू स्टेडियमवर 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकांनद जयंती निमित्त  युवादिनी 19 राष्टीय युवा महोत्सव या पुरस्काराचे वितरण  झाले. यावेळी गृहमंत्री राजनाथसिंह, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या हस्ते,  केंद्रीय युवा कार्य, खेळ राज्यमंत्री  (स्वतंत्र प्रभार) श्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.  भविष्यात उद्‌भवणाऱ्या
देशातील सर्वाधिक प्रदूषणासाठी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला विपुल वनसंपदा लाभली आहे. येथे वन्यजीव मोठ्या संख्येने मुक्त संचार करतात. मात्र, त्यांच्या संरक्षणाला मानवीकृतीचा धोका पोहोचत आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासह पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होणारी मानवी हानी टाळण्यासाठी धोतरे यांनी इको-प्रो नामक संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून वन्यजीवांचे रक्षण, पर्यावरण, ऐतिहासिक स्थळांचे जतन, नगर संरक्षणासाठी युवकांची फौज तयार केली. सैन्य दलासारखा पॅन्ट आणि हिरव्या रंगाची कॉलर असलेली सफेद टी-शर्ट असा या कार्यकर्त्यांचा गणवेश असतो. साप असो की वाघ, मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या हिंस्र जीवांना स्वत:चे जीव धोक्‍यात घालून जीवनदान देण्याचे काम इको-प्रोचे कार्यकर्ते करीत आहेत.
ताडोबा अभयारण्याजवळील अदानी प्रकल्पविरोधी आंदोलनामुळे धोतरेंचे कार्य देशपातळीवर पोहोचले. त्याला शहरातील अन्य संघटना आणि नागरिकांनी दिलेली साथ महत्त्वाची होती. अदानीविरुद्ध 25 जुलै 2009 ला बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. तेव्हा मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंग यांनी भेट देऊन कौतुक केले होते. धोतरे यांनी वन्यजीवांच्या प्रश्नासह रेल्वे मालधक्का, धूळप्रदूषण, बाबूपेठ उड्डाणपूल, चंद्रपूरला व्याघ्र जिल्ह्याची मागणी यासारख्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हस्ते "संघर्ष सन्मान पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. 21 एप्रिल 2014 रोजी बल्लारपूर येथे एका गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी राबविलेल्या रेस्कू ऑपरेशनदरम्यान बंडू धोतरे थोडक्‍यात बचावले होते. जीव धोक्‍यात घालून वन्यजीवांच्या रक्षणासाठीचे त्यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
समस्यांची जाणीव ठेवून वन व वन्यजीवांचे संरक्षण, प्रदूषणाचा विरोध, ऐतिहासिक वास्तूंचे जतन यासाठी झटणारा तरुण कार्यकर्ता म्हणजे बंडू धोतरे. चंद्रपूर जिल्ह्यातील अदानी प्रकल्पाचा कडाडून विरोध केल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या बंडू धोतरेंच्या गत 12-13 वर्षांतील प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने त्यांची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड केली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.