সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, March 09, 2013

राज ठाकरे १६ला चंद्रपुरात

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे १६ मार्च रोजी जिल्ह्यात येत आहेत. ते मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. याच दिवशी ते गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांशीही चर्चा करणार आहेत. या दौर्‍यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपाध्यक्ष रिटा गुप्ता, आ. नांदगावकर, शिंदे, प्रविण दरेकर, राम कदम यांची उपस्थिती राहणार आहे. यासंबंधाने काही दिवसांपूर्वीच मनसेचे पूर्वविदर्भ संघटक हेमंत गडकरी यांनी पदाधिकार्‍यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला मनसे जिल्हाध्यक्ष रामेडवार, राजू कुकडे, राहूल बालमलवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.