সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, March 17, 2013

' बिराड ' कार अशोक पवार मुलाखत


मुलाखत                                                  
स्वानुभवातून बेड्यांवरील वेदना आपल्या लिखाणातूनमांडणारे प्रसिद्ध साहित्यिक ' बिराड ' कार अशोकपवार यांच्या ' पडझड ' या कादंबरीला अलीकडेच महाराष्ट्र शासनाचा ' हरी नारायण आपटे ' हा एकलाखाचा पुरस्कार मिळाला . पालावरचे आयुष्य , त्यांचा लेखनप्रवास , भविष्यातील योजनात्यानुषंगाने त्यांच्याशी साधलेला संवाद ... 

- 
लिखाणास झालेली सुरुवात ते पुरस्कारापर्यंतचा प्रवास , हा अनुभव कसा आहे ? 

जन्म झाला , तेव्हापासूनच भटकेपणा अनुभवतोय . बाप या गावातून त्या गावात पोटासाठी बिराडघेऊन फिरत होता . नशीब ... चुकून शाळेशी धागा जुळला . थोडंफार शिक्षण मिळालं ... पणपरिस्थितीपायी शाळाही सुटली . बिराडावर आलो नि लग्न केलं . पण आम्हा भटक्यांच्या पाठी काहीना काही समस्या चिकटल्याच असतात . माझ्याही बाबतीत तेच झालं . संसार सुरू असताना मलाक्षयरोग झाला . पत्नी यशोदाही आजारी . अशा परिस्थितीत काय करावं ... ? शेवटी मुलगाअनाथालयाला देऊन टाकला . काहीच दिवसांत यशोदाही जग सोडून गेली . उभं केलेलं बिराड एकाक्षणात खचलं . मीही पुरता खचून गेलो . जीवन नकोसं वाटू लागलं . आत्महत्येचे विचार मनातआले . रेल्वेरूळावर गेलो . काय वाटलं काय माहीत , पण परत आलो . दारूचे व्यसन जडले . चो- याही केल्या . पोलिस ठाण्यात मुक्काम झाले , मारही खाल्ला . कारागृहात असताना चुकून एककादंबरी हातात पडली . तेथूनच वाचनाचं वड निर्माण झालं . क्षितिजापलीकडचं दिसू लागलं . नवंजग कळू लागलं . स्वत्वाची जाणीव झाली . नवी उमेद पेरली गेली . कार्यकर्ता झालो . स्वतःचंचजीवन लिहावंसं वाटू लागलं . ' बिराड ' लेखणीतून उतरली नि २००१ ला प्रकाशित झाली . हालिखाणाचा प्रवास सुरूच आहे . आज ' पडझड ' ला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला . 

पुरस्काराबद्दलची भावना ? 

नवी उर्मी मिळाली . यापूर्वीही राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील ३१ पुरस्कार मिळालेले आहेत . ' पडझड' ला मिळालेल्या पुरस्कारामुळे खेड्यातल्या माणसापासून ते प्राध्यापकापर्यंत आणि आमदारापासून तेमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच अभिनंदन केलं . आजपर्यंतच्या जीवनसंघर्षाची दखल घेतली गेली , असे वाटते. पालातून ( बेडे ) सुरू झालेला आयुष्याचा प्रवास आज राज्यशासनाच्या पुरस्कारार्यंत आला , याचेनिश्चितच समाधान आहे . तरीही शोषित , पीडित माणसं हवी तशी पुढे आलेली नाहीत . ती पुढेयावीत , असं वाटतं . 

- 
सध्याच्या यशस्वी प्रवासाबद्दल समाधानी आहात का ? 

कलावंत वा लेखक कधीच समाधानी नसतो . तो सदैव अस्वस्थ असतो . या अस्वस्थतेतूनच तोनवनिर्मिती करीत असतो . कलावंत वा साहित्यिक समाधानी असणे म्हणजे तो त्याचा मृत्यू आहे ,असं मी मानतो . तसंही मी पुरस्कारासाठी लिहित नाही , तर माणसांसाठी लिहितो . शोषित ,मोडका माणूसच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे . नावलौकिकता , पुरस्कार माणसाला , त्याच्याविचारांना मोठे करून प्रतिष्ठा मिळवून देत असतात , एवढंच . ' बिराड ', ' इळनमाळ ', ' दर कोसदर मुक्काम ' ही माझी पुस्तकं प्रकाशित झाली . राज्यातल्या पाच विद्यापीठांमध्ये तीअभ्यासक्रमाला आहेत . नावलौकिकतेमुळे आनंद झाला . ही नावलौकिकताच माझ्या लिखाणाचीप्रेरणा आहे . या सर्व पुस्तकांत मी माझा  भटक्या - विमुक्तांचा वास्तववादी जीवनसंघर्ष उभा केलाआहे . या भटक्यांचे जीवन सुजाण माणसांनी समजून घ्यावं , एवढीच माफक अपेक्षा आहे . 

- 
आपल्या मते साहित्याची परिभाषा काय ? 

वास्तवदर्शी जगण्याच्या जीवनसंघर्षातून जे साहित्य बोलीभाषेत जन्माला येतं , तेच साहित्य श्रेष्ठदर्जाचं असतं . त्याला अनुभवाची जोड असावी . अशा साहित्याला कोणतंही स्थळ , काळ आणिकौटुंबिक परिस्थितीची मर्यादा नसते . मात्र , त्यामध्ये विचारांची पारदर्शकता हवी . जे साहित्यदुःखातून निर्माण होतं , तेच वाचकांच्या मनाचा ठाव घेतं . जीवनसंघर्षातून नव्यानं जगण्याचीआंतरिक प्रेरणा मिळते . तीच साहित्यकृती यशस्वी ठरते . 

- 
पालांवरील आयुष्याची पडझड थांबली , असं वाटतं का ? 

थोडंफार समाधान आहे . पण , पडझड अजून थांबलेली नाही . पोलिस  शासकीय यंत्रणा आजहीया समाजाला दरोडेखोर वा बदमाश म्हणूनच पाहते . या समाजाचं भटकणं अजूनही थांबलेलं नाही .पालांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतंच आहे . आधी तालुकास्तरावर , मग जिल्हास्तरावर , नंतरराज्यसंतरावर आणि आता तर देशस्तरावर या समाजाची भटकंती सुरूच आहे . भटकंतीच्या कक्षाअधिक रुंदावल्या आहेत . शिक्षण जसं पाहिजे तसं त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही . वाढत्याजागतिकीकरणाचा , महागाईचा कमालीचा फटका या समाजाला बसतो आहे . परिस्थिती तीच आहे .शासनपुरेसं लक्ष या समाजाकडे देत नाही . हा समाज शासनाकडे आशेनं पाहतो , पण त्यांच्याअपेक्षा काही पूर्ण होत नाहीत . अनेक समाजबांधवांना तर शासनानं अद्याप आधार कार्डही दिलेलेनाहीत . 

- 
अशावेळी आपली भूमिका ? 

याच पालांतून अशोक पवार निघाला आहे . असे अनेक अशोक पवार निघावेत , अशी मनीषा आहे .पण , मी एकटा काय काय करणार ? माझ्या परीनं मी स्वतःला या समाजाच्या उत्थानासाठीझोकून दिलं आहे . या समाजाचं जीवन माझ्या लिखाणातून शासनासह सर्वांपर्यंत पोहोचविण्याचंमाझं कार्य सुरूच आहे . 

- 
लिखाणासाठी वेळ कसा देता ? 

मी चंद्रपुरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक आहे . या नोकरीमुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटला .जगण्यासाठी प्रसिद्धी नको , तर भाकर हवी . मालतीसोबत आयुष्याचं बिराड पुन्हा उभं केलं . तिचीमोलाची साथ आहे . म्हणून लिखाणाला वेळ मिळतो . नोकरीच्या कर्तव्यात कसूर  करता लिहितो. दिवस जरी कामात गेला , तरी रात्र आपली असते . त्यावेळीच मनातलं कागदावर उतरतं . 

- 
पुढच्या योजना ? 

बस्स , कादंब - यांतून जगण्याचा संघर्ष लोकांपुढे आणणे . आयुष्याची जितकी वर्षे शिल्लक आहेत, तीही लिखाणाला कमी पडतील . या प्रवासात खूप लोकांनी मदत केली . ती यादी इतकी लांब आहेकी जागा कमी पडेल . त्यांच्या ऋणात आहे .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.