সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, March 06, 2013

आष्टा येथे पट्टेदार वाघाचा १० तास ठिय्या


चंद्रपूर,दि.०६ (प्रतिनिधी):
वरो-यापासून अंदाजे २५ किलोमिटर अंतरावरील भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे पट्टेदार वाघाने तब्बल १० तास ठिय्या दिल्याने गावकèयांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. अखेर सायंकाळी या पट्टेदार वाघास गावातून पिटाळून लावण्यात यश आल्याने गावकèयांनी सुटकेचा श्वास सोडला. या वाघाने एका वनकर्मचाèयास जखमी केले.
भद्रावती तालुक्यातील साडेतीन हजार लोकवस्तीचे आष्टा हे ताडोबा जंगलापासून २ किलोमिटर अंतरावरील हे गाव. येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास काही गावकरी आपली प्रातविधी आटपून परत गावात येत असताना गावाच्या उत्तरेकडे असलेल्या कॅनलकडून एक पट्टेदार वाघ येताना त्यांना दिसला. दादाजी लेनगुरे नामक व्यक्तीस तो प्रथम दिसला. या गावकèयांनी त्याला दगड मारून कल्ला केल्याने तो बिथरला व गावाच्या दिशेने जावू लागला. सर्वप्रथम हा वाघ विहिरीच्या दिशेने गेला. परंतु, तेथे काही महिला पाणी भरत होत्या. त्यामुळे त्यांच्या आवाजामुळे तो प्रथम रामकृष्ण लोनबळे यांच्या घराकडे तर नंतर दिलीप रामगुंडे यांच्या घराशेजारी असलेल्या झुडपात जावून बसला. गावात वाघ आल्याची वार्ता वाèयासारखी पसरताच प्रत्येकजण वाघ पाहण्यास घटनास्थळी जमू लागला. या घटनेमुळे गावकèयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गावात वाघ आल्याचे वृत्त पोलिस व वनविभागाला कळविण्यात आले. यादरम्यान ही वार्ता परिसरातील गावातही पसरली. त्यामुळे नागरिकांचे लोंडेच्या लोंडे आष्टा या गावाकडे जावू लागले. यामुळे घटनास्थळी गर्दी झाली. नागरिकांच्या या गर्दीमुळे वाघ जेथे होता, तेथून बाहेर निघत नव्हता.
वाघ गावात शिरल्याचे वृत्त कळताच चंद्रपूरचे सहायक वनसंरक्षक अरूण तिथे, क्षेत्र संरक्षक एम. एन. निबुद्धे, ताडोबाचे आर.एस.ओ. बी. एस. पळवे, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सचे बी. सी. येडे, मोहुर्ली एस.टी.पी.एस. च्या पुष्पलता बेडे, डी.एस.ओ. दोंदल हे घटनास्थळी आपल्या कर्मचाèयांसह पोहोचले. तसेच वरो-याचे परिक्षाविधीन उपविभागीय पोलिस अधिकारी समिर शेख, शेगांवचे ठाणेदार हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती आपल्या हातात घेतली. आष्टा येथे जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चिमूर, शेगाव, वरोरा, चंद्रपूर येथील पोलिस ताफा घटनास्थाळी पोहोचला. इको प्रोचे बंडू धोतरे, संदीप जीवने, गणेश येरगुडे, निलेश ठाकरे हे आपल्या सहकाèयांसह घटनास्थळी पोहोचले. या सर्वांनी या वाघास बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. परंतु, लोकांच्या गर्दीमुळे वाघ बाहेर येत नव्हता. शेवटी चंदनखेडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पुरूषोत्तम कडूकर, आष्टाचे डॉ. संदीप राठोड, शेगावचे सहायक पशुधन अधिकारी डॉ. विनय कांबळे, बफरझोनचे डायरेक्टर कल्याणकुमार, गुंगी तज्ज्ञ वशिष्ट हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर वाघास गुंगीचे इंजेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी ५.३० वाजताच्या सुमारास वाघास गुंगीचे इंजेक्शन दिल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाघाने आपले ठिकाण सोडले व तो गावाबाहेर निघाला. इको प्रोच्या कार्यकत्र्यांचे साहस व हिम्मत ही वाखान्यजोगी होती. वाघास बाहेर काढण्यास त्यांचा qसहाचा वाटा दिसून येत होता. हा पट्टेदार वाघ मादी असून, ती गरोदर असल्याने त्या वाघिणीला बाहेर काढण्यास वनविभागाला अत्यंत काळजी घ्यावी लागली. वाघाने सकाळी एका लहान मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, तिला वाचविणाèया रत्नाकर बोरकर हा वनकर्मचारी वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला. वाघाने त्याच्या पायावर पंजाने जखमी केली.
घटनास्थळी खा. हंसराज अहिर यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ताडोबाला लागून असलेल्या गावात अशाप्रकारच्या घटना नेहमीच घडत आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण लोकसभेत उपस्थित करून केंद्राजवळ जमा असलेला हजारो रुपयांचा कांपाफंड वापरून ताडोबा जंगलाला सोलर कुंपन बांधण्यासाठी प्रयत्न करू. हा कांपा फंड राज्य सरकारचा असून, तो केंद्राजवळ जमा असल्याने यासाठी तो वापरणे सोयीचे होईल. आष्टा गावात वाघ शिरल्याचे कळताच खासदार महोदयांनी वाईल्ड लाईफ कांझर्वेशन ट्रस्टचे सचिव नखवी व जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला व योग्य कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.