रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ असलेल्या जगबुडी नदीत आज (मंगळवार) पहाटे खासगी बस कोसळून 27 प्रवासी मृत्युमुखी पडले. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघे अत्यवस्थ आहेत.आज पहाटे 3.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. महाकाली ट्रॅव्हल्स कंपनीची बस गोव्याहून मुंबईकडे जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस जगबुडी नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळली. त्यामुळे 27 जण मृत्युमुखी पडले. अपघात झाल्यानंतर लगेच बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 26 मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते.
मृतांची नावे
1. मिर्झा बेग - मुंबई
2. गुरूदत्त माने - अंधेरी
3. संतोष राठोड - पोलादपूर
4. फिलिंका फर्नांडिस - गोवा
5. मिथुन पेडणेकर - सावंतवाडी
6. रविंद्र सावंत - अंधेरी
7. वीरेंद्र यादव - दिवा
8. प्रकाश तळवटेकर - तरळा
9. प्रकाश पवार - गोवा
10. इस्तावेन फर्नांडिस - गोवा
11. सेविनवेती फर्नांडिस - सांताक्रुझ
12. बाप्टीस फर्नांडिस - विलेपार्ले
13. रामबहाद्दुर गुप्ता - ग्रॅण्टरोड
14. बाप्टीस फर्नांडिस - कणकवली
15. अफोदे डिसुझा - गोवा
16. शैलेंद्र हळदणकर - अकोला
17. पॅड्रीक मिंडिस - गोवा
जखमींची नावे
1. संताजी किरदत्त - सातारा
2. शिवराम गारूडी - गोवा
3. शिवराम धानगी - कणकवली
4. वशिष्ठ खोणी - नवी मुंबई
5. आलम शेख - वांद्रे
6. लालू रोहिदास - गोरापूर
7. मारिया कॉस्टन - रशिया
8. सारिका सरमळकर - नेरूळ
9. कामरूद्दीन शेख - वांद्रे
10. मैरूद्दीन मलिक - केरापूर
11. जयराम सरमळकर - नेरूळ
12. ऑल्विन फर्नांडिस - गोवा
13. मोरेश पडसेकर - गोवा
14. महेश मयेकर - रत्नागिरी

