সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, March 18, 2013

२२ मार्च पासून ग्रंथ, नृत्य व संगीताचा त्रिवेणी संगम

सुप्रसिध्द गायक हरिहरन यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी
चंद्रपूर दि.१८- सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई,  जिल्हाधिकारी कार्यालय  व जिल्हा माहिती कार्यालय     चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२, २३ व २४ मार्च रोजी चांदा क्लब मैदानावर चंद्रपूर सांस्कृतिक महोत्सव तथा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  या अनुषंगाने ग्रंथ, नृत्य व संगीताचा त्रिवेनी संगम चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळणार असून सुप्रसिध्द गायक हरिहरन, विख्यात नृत्यांगना पार्वता दत्ता व सुफि गायक पदमश्री भारती बंधु यांच्या कलाविस्कारांना प्रत्यक्ष पहाण्याची संधी मिळणार आहे. 
    चंद्रपूर सांस्कृतिक महोत्सव तथा ग्रंथोत्सवाचे उदघाटन शुक्रवार २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता चांदा क्लब मैदानावर होणार असून उदघाटनानंतर सांयकाळी ७ वाजता  सुप्रसिध्द गायक हरिहरन यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल.  २३ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजता विख्यात नृत्यागंणा  पार्वता दत्ता यांच्या बहारदार नृत्याची मेजवाणी प्रेक्षकांना मिळणार आहे.  तर २४ मार्चची सायंकाळ पदमश्री भारती बंधू यांच्या सुफि गायनाने मंतरली जाणार आहे. २४ मार्चलाच सायंकाळी ६.३० ते ७.३० या दरम्यान गायीका समृध्दी इंगळे (उर्जानगर चंद्रपूर) यांचे गायन होणार आहे.
    या सांस्कृतिक महोत्सवात चंद्रपूर येथील स्थानिक कलावंत नटराजस्तुती व दरबारी धुन भाग्यलक्ष्मी देशकर, गणेशवंदना व घिरघिर बदरा मृणालीनी खाडीलकर, स्वागत गीत व गायत्रीमंत्र सागर अंदनकर व आदिवासी नृत्य सुशिल सहारे ग्रुप सादर करणार आहेत.  स्थानिक कलावंताचे कार्यक्रम ६.३० ते ७.३० या वेळात होणार असून सर्व कार्यक्रमांना निशुल्क प्रवेश असणार आहे.
    यानिमित्ताने ग्रंथोत्सवाचे आयोजन चांदा क्लब मैदानावर करण्यात आले असून सकाळी १० ते रात्रो ९ या वेळात ग्रंथ प्रदर्शन व विक्री उपलब्ध असणार आहे.  ग्रंथोत्सवादरम्यान परिसंवाद व निमंत्रीतांचे कमी संमेलनाचे आयोजन २३ व २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डॉ.शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय रामाळा तलाव रोड चंद्रपूर या ठिकाणी करण्यात आले आहे. 
    कवी संमेलनात सुप्रसिध्द कवी व निवेदनकार अजिम नवाज राही यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.  वाचन संस्कृति आणि आपण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.  चांदा क्लब येथे होणा-या ग्रंथप्रदर्शनीत नामांकित ग्रंथ विक्रेते व प्रकाशक सहभागी होणार आहेत.  सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवाचा लाभ नागरीकांनी घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक व  ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी केले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.