সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 12, 2015

इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात

इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात
‘इको-प्रो मिशन सेव्ह बर्ड’ अंतर्गत ठिक-ठिकाणी पक्ष्यांकरीता ‘जलपात्र’ ची सोय

चंद्रपूरः इको-प्रो पर्यावरण संस्थेतर्फे ‘इको-प्रो मिशन सेव्ह बर्ड’ या अभियाना अंतर्गत पक्ष्यांकरीता जलपात्र वितरण अभियानाची सुरूवात आज करण्यात आली.
इको-प्रो तर्फे आज या अभियानाची सुरूवात श्री गणपती गरड, क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक, ताडोबा-अंधारी व्याघ्र  प्रकल्प, चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी श्री गजेन्द्र नरवणे, उप संचालक, बफर, श्री मजहर अली, श्री मंदार नाईक, भक्ती नाईक, मुंबई व इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे प्रामुख्यांने उपस्थित होते. श्री गणपती गरड यांनी उपस्थितांना उन्हाच्या दाहकतेमुळे वन्यप्राणी पशु-पक्षी यांना संकटाना सामोरे जावे लागते, यांचे संरक्षणासाठी नागरीकांनी सुध्दा पुढकार घ्यावा असे आवाहन करीत, घरोघरी पक्ष्यांकरीता जलपात्र ठेवण्याचे महत्व विषद केले.
चंद्रपूर शहरात उन्हाची दाहकता अधिक असल्याने मनुष्य प्राण्यासोबत पशु-पक्षीना सुध्दा याचा त्रास सहन करावा लागतो. शहरी भागात क्राकींट च्या जंगलात असणाÚया पशु-पक्षीना पाण्याची सोय व्हावी याकरीता इको-प्रो तर्फे दरवर्षी शहरात ठिकठिकाणी मानवी वसाहतीत येणाÚया पक्षी करीता उन्हाच्या दाहकतेपासुन सुटका व्हावी, पाण्याची सोय व्हावी या हेतुने पक्ष्यांकरीता विशेष करून तयार करण्यात आलेले मातीचे जलपात्र च्या माध्यमाने पाण्याची सोय करून देण्यात येते. शहरातील सुजाण व पर्यावरण, पक्षी प्रेमी नागरीकांना आपल्या घरी येणाÚया पक्षांकरीता पाण्याची सोय करता यावी याकरीता पक्षी जलपात्र वाटप केले जाते.
संस्थेच्या माध्यमाने यंदा 1000 जलपात्र तयार करण्यात आले असुन याचे चंद्रपूर शहरात वाटप केले जाणार आहे. शहरातील उन्हाची दाहकता आणी पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटंकती काही अंशी कमी व्हावी हा प्रयत्न असणार आहे. सोबतच नागरीकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी हा सुध्दा या अभियानाचा भाग आहे. यंदा या अभियानाअंतर्गत ज्या-ज्या ठिकाणी पक्षी जलपात्र ठेवले जाणार आहे त्याची संस्थेतर्फे नांेद केली जाणार असुन.
कार्यक्रमाचे संचालन नितीन रामटेके व आभार विजय हेडाऊ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थेचे अमोल उटट्लवार, राहुल कुचनकर, शंशाक मुजंनकर, विश्वजीत इंगलवार, अभय अमुतकर, सचिन धोतरे, करिश्मा सोनपिंपरे, मयुरी आत्राम, हर्षा पोटदुखे, शुभांगी दांडेकर यांनी सहकार्य केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.