সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 26, 2015

महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित आणणार

नेपाळ येथे दिनांक 25 एप्रिल 2015 रोजी झालेल्या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी झालेली आहे. नेपाळ येथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना भारतात सुरक्षितपणे परत आणण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येत आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे समीर सहाय, अतिरिक्त निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन यांचे नेतृत्वाखाली स्वतंत्र सेलची स्थापना केली असून हेल्प लाईन देखील सुरू केलेली आहे. नवी दिल्ली येथील हेल्प लाईन क्रमांक 011-23380324 011-23380325 आहे. मुंबई मंत्रालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक 022-22027990 हा आपत्कालीन क्रमांक म्हणून जाहीर करण्यात आला आहे.मंत्रालय नियंत्रण कक्ष 24 x7 कार्यरत असून संबंधित अधिकारी दिनांक 24एप्रिल रोजी दुपारपासून नियंत्रण कक्षात उपस्थित असून परिस्थतीवर लक्ष ठेऊन आहेत. दिनांक 26.4.2015 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली यांना राज्यातील संपर्क झालेल्या 600 पर्यटकांची आणि संपर्क न (न) झालेल्या 150 पर्यटकांची यादी मंत्रालय नियंत्रण कक्षातून पाठविण्यात आली आहे. सदर यादी नेपाळ येथील भारतीय दूतावासामार्फत नेपाळ सरकारकडे सादर करण्यात आली आहे. संपर्क झालेल्या 600 पर्यटक हे सुरक्षित असून या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत करण्यात आली आहे. काठमांडू विमानतळावरुन उपलब्ध विमानाद्वारे महिला, वृध्द आणि लहान मुले यांना प्राधानान्याने भारतात पाठविण्यात येत असून उर्वरित पर्यटकांना देखील लवकरच भारतात परत आणण्यात येईल.
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा. मंत्री, महसूल हे परिस्थितीवर जातीने लक्ष ठेऊन असून महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सतत संपर्कात आहेत.
सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी नेपाळ येथे गेलेल्या त्यांच्या जिल्हया तील पर्यटकांबाबत माहिती मिळवण्यासाठी दूरदर्शन, आकाशवाणी, स्थानिक टि.व्ही चॅनल/वर्तमानपत्रामध्ये जाहीर आवाहन केले आहे. पर्यटकांची माहिती संकलीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.
मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक सज्ज ठेवण्यात आले असून आवश्यकता भासल्यास सदर पथकांना शोध व बचाव कार्यासाठी नेपाळ येथे पाठविण्यात येईल.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.