राज्यात 1 मे पासून दर रविवारी 12 ठिकाणी ‘कलांगण’
देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा होणार अनोखा संगम
महाराष्ट्रात पहिल्यांदाच 1 मेपासुन विविध ठिकाणी देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा अनोखा संगम असलेला प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम ‘कलांगण’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे. विरश्री आणि संगीत यांचा मिलाप असलेला पोलीस बॅंड, संरक्षण बॅंड, वैभवी गोरवगाथेचे कथन करणारा लघुपट, संस्कृतीच्या वारशाचे लोककलेव्दारे दर्शन असा हा उपक्रम दि. 1 मे 2015 पासून मुंबइ्र्र आणि महसुली विभागाच्या मुख्यालयासह अन्य जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दर रविवारी सायंकाळी 7 ते 8 या वेळेत सादर होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे दिली.
लोप पावत चाललेल्या लोक कला यांच संर्वधन, लोकान मध्ये ती कला रूजावी, सोबतच स्थानिक लोककलावंताना सादरीकरणासाठी मंच देऊन प्रोत्साहन व युवकांमध्ये देशभक्तीची भावना रूजावी असा उद्देश ‘कलागंण’ कार्यक्रमाचा असुन राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणविस, राज्याचे सांस्कृतीक मंत्री मा. विनोद तावडे, व चंद्रपूरचे पालक मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतुन साकार होणारा आहे.
शहराच्या मुख्य भागात लोकांना सहज पाहता येईल. या अनुषंगाने चंद्रपूर मधिल ‘आझाद गार्डन’ येथे ‘कलांगण’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात चंद्रपूर पोलीस बॅंड ने होईल त्यांनतर समुहगाण, वैभवी गोरवगाथेचे कथन करणारा लघुपट, संस्कृतीच्या वारशाचे लोककलेव्दारे दर्शन या मध्ये 1 शाहीरी पोवाडा, खडी गंमत, दंडार, डहाका, घोडा नाच, गोंधळ, दंडी गाण, ददरीया असे एकापेक्षा एक असे सरस लोककलांचे सादरीकरण स्थानिक लोककलावंतांकडून केले जाईल व शेवट पोलीस बॅंड ने होईल. सदर कार्यक्रम ‘आझाद गार्डन’’ येथे संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत सादर होणार आहे. तरी चंद्रपूर रसीकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाचे समन्वयक सुशील सहारे यांनी केली आहे.