गडचिरोली,-जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असताना नक्षल्यांनी आज(ता.१९) मध्यरात्री अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील उपसरपंचाची गोळया घालून हत्या केली. पत्रू बालाजी दुर्गे(५०) असे मृत उपसरपंचाचे नाव आहे.
रात्री सशस्त्र नक्षली दामरंचा येथे गेले. त्यांनी पत्रू दुर्गे यांना झोपेतून उठविले आणि घराबाहेरच त्यांची गोळया झाडून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. येत्या २४ एप्रिलला अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार तालुक्यांतील ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. मात्र नक्षल्यांच्या दहशतीमुळे सुमारे ४३ ग्रामपंचायतींमध्ये एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. त्यातच आज नक्षल्यांनी उपसरपंचाची हत्या केल्याने उमेदवारांसह नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, नक्षल्यांनी जिमलगट्टा-गुंडेरा मार्गावरील हनुमान मंदिराजवळ एक बॅनर बांधल्याचे आढळून आले. तसेच रस्त्यावर पत्रकेही टाकण्यात आली आहेत. नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालावा, अशी ताकीद या बॅनर व पत्रकांमधून देण्यात आली आहे.