चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर नवीन सैनिकी शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात यावा, असा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. अर्थ व वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय राज्य शासनाने घेतला.
शुक्रवारी (ता. 10) विधानसभेत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा ठराव मांडला. विधानसभागृहाने एकमताने हा ठराव मंजूर केला. 9 एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभेत या विषयाबाबत ठराव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाबाबत सतत प्रयत्न व पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र, गुजरात तथा गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांच्याशी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या विषयाबाबत चर्चा केली.