महाराष्ट्राची पहिली भंगीमुक्त नगरपालिका म्हणून नावलौकिकास असलेल्या उमरेड नगरपालिकेने स्वच्छतेचे पुरस्कारही पटकावले. 16 व्या शतकापूर्वी निर्माण झालेले, ब्रिटिशांची राजवट पाहिलेले हे शहर नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नागपूरपासून 47 किलोमीटर अंतरावर आहे. कोळसा खाणीमुळे प्रकाशझोतात आलेल्या या शहरातून विणकरांचा खडखडाट कायमचा बंद झाला. गोंड राजा बख्त बुलंद शहाच्या कारकिर्दीतील हे पुरातन शहर. परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या उंबराच्या झाडांमुळे या भागाला "उमरेड' असे नाव पडल्याचे पुरातन दाखले आहेत.
....
महामानवांचा पदस्पर्श
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माई साहेबांनी या परिसराला भेट दिली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी येथे भजनाद्वारे जनजागृती केली. 1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी याच ठिकाणी विशाल जनसमुदायाला मार्गदर्शन केले. याचवेळी इतवारीपेठेत त्यांचा सत्कारही करण्यात आला. या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले उमरेड शहर विकासाचे एक एक पाऊल पुढे टाकत आहे.
...
दृष्टिक्षेपात उमरेड
भौगोलिक क्षेत्र : 87,740.41 हेक्टर
एकूण लोकसंख्या : 53,971
स्त्रिया : 26,515
पुरुष : 27,456
राष्ट्रीयीकृत बॅंका : 9
नगर परिषद : 1
न. प. सदस्य : 24
पोलिस स्टेशन : 1
सार्वजनिक वाचनालय : 4
शासकीय गोदाम : 1
माध्यमिक विद्यालय : 7
महाविद्यालय : 4
नगर परिषद शाळा : 9
खासगी प्राथमिक शाळा : 4
बचतगट : 300
सार्वजनिक विहिरी : 38
हातपंप : 199
तलाव : 2
खासगी तलाव : 1
कृषी सेवा केंद्र : 22
स्वस्त धान्य दुकान : 22
सहकारी पतसंस्था : 41
...
ट्रॉमा केअर युनिट
उमरेडचे ग्रामीण रुग्णालय महामार्गावरून 2 किलोमीटर आत आहे. रुग्णालयाकडे जाणारे रस्ते अरुंद व वर्दळीचे आहेत. त्यामुळे अपघातग्रस्ताला वेळीच उपचार मिळत नाही. प्रसंगी त्याचा जीवही जातो. ट्रॉमा केअर युनिट सुरू झाल्यास सर्जन, फिजिशियन, आर्थोपेडिक डॉक्टर यांची त्वरित सेवा मिळेल. जानेवारी 2012 मध्ये ट्रॉमा केअर युनिट मंजूर झाले. परंतु, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ते अद्याप सुरू झालेले नाही.
...
उमरेड : 5
क्रीडा संकुल
येथील आर. पी. बैस मैदानावर 17 ऑगस्ट 2004 रोजी सुरू झालेले क्रीडा संकुलाचे काम अद्याप अपूर्ण आहे. विद्यार्थी, तरुणांच्या अंगीच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, यासाठी नगरपालिकेने क्रीडांगणासाठी 1.40 हे. आर. जागा दिली. 26 फेब्रुवारी 2004 ला विनामोबदला तत्त्वावर पालिकेने करारही केला. वर्षभरानंतर अचानक काम ठप्प पडले. त्यामुळे क्रीडा शिक्षक, खेळाडूंमध्ये प्रशासनाप्रति नाराजी आहे. 25 लाखांचा निधी मंजूर होऊनही काम अपूर्ण का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातो. नुकतेच क्रीडा संकुलाचे काम सुरू झाले. नगरपालिकेने ते त्वरित पूर्ण करावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
...
पशुवैद्यकीय रुग्णालय
जोगीठाणा पेठ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे. डागडुजीअभावी रुग्णालयाची इमारत मोडकळीस आली. नवीन रुग्णालय गावाबाहेर हिरव्या तलावाच्या मागे आहे. बहुसंख्य नागरिकांचा व्यवसाय शेती असल्याने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. रुग्णालय गावाबाहेर असल्याने जनावरांना नेण्यास बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे रुग्णालय सध्याच्या ठिकाणीच ठेवावे किंवा गावालगत एखादी जागा शोधावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
.....
गॅस सिलिंडर
नंबर लावूनही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. ऑनलाइन नंबर लावूनही 15 ते 20 दिवस सिलिंडर घरपोच येत नाही. सिलिंडरची पावती एजन्सी कार्यालयात जाऊन फाडल्यास ग्राहकाला एजन्सीकडून 18 रुपयांची सूट मिळणे अपेक्षित असते. परंतु, कंपनीकडून सूट मिळत नाही. शहरात दुसरी एजन्सी सुरू झाल्यास संबंधित कंपनीची मनमानी थांबेल.
....
एमआयडीसी उद्योग
शहरात लहान-मोठे जवळपास 20 उद्योग कार्यरत आहेत. त्यापैकी काही बंद होण्याच्या स्थितीत आहेत. टाटा व ईरा कंपनीने प्रोजेक्ट सुरू केल्याने औद्योगिक विकासाला चालना मिळाली. तीन मोठ्या कंपन्यांचे टॉवर प्रोजेक्ट याच परिसरात सुरू झाले. टॉपवर्थ ऊर्जा व मेटल कंपनीअंतर्गत कच्चे लोखंड तयार करण्याचा उद्योग खूप वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहे. बंद उद्योग पुन्हा सुरू झाल्यास रोजगाराला चालना मिळेल. स्थानिकांना डावलले जात असल्याने नागरिकांमध्ये कंपनी प्रशासनाप्रति रोष आहे.
...
उमरेड : 6
अतिक्रमण
राज्यमंत्री राजेंद्र मुळक व न. प. उपाध्यक्ष गंगाधर रेवतकर यांच्या अथक प्रयत्नाने उमरेड शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु, फुटपाथ व्यावसायिकांनी सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. सकाळी आणि संध्याकाळी मुख्य मार्गांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. लहान-मोठे अपघात नित्याची बाब आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे.
...
उमरेड : 9
नायडू बाजार
मुख्याधिकाऱ्यांचे निवासस्थान नायडू बाजार परिसरात आहे. या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. परिसरात सार्वजनिक शौचालय असूनही, उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन परिसर स्वच्छतेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
...
रेल्वे मार्ग
ब्रिटिशकालीन असलेल्या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास परिवहनाचा प्रश्न सुटेल. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. माजी खासदार मुकुल वासनिक यांनी या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी मिळवून दिली. नंतरच्या काळात लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने हा मार्ग अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक दररोज या गाडीने प्रवास करतात. नागपूरलगत असलेले उमरेड औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहे. शिक्षणाच्या बाबतीतही शहर अग्रेसर आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, बी. एड. महाविद्यालय, शासकीय-खासगी आयटीआय, बीपीएड महाविद्यालय येथे आहे. हा रेल्वेमार्ग मोठा झाल्यास शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होईल.
..
आठवडीबाजार
आठवडीबाजारासाठी आरक्षित जागेवर पालिकेने लाखो रुपये खर्चून ओटे बांधले. परंतु, आजही रस्त्यावरच बाजार भरतो. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे स्थानिक रहिवासी तसेच नागरिकांची गैरसोय होते. वापर नसल्याने ओट्यांची दुरवस्था झाली. पालिकेचे लाखो रुपये वाया गेले. लवकरच आठवडीबाजार स्थानांतरित केला जाईल, असे पालिकेच्या वतीने वारंवार सांगितले जाते. परंतु, विक्रेते जागा सोडण्यास तयार नाहीत.
...
गुन्हेगारी
गुन्हेगारांना पोलिसांचे अभय असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे फावते. पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी. तसेच पोलिस वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्या.
...
उमरेड : 4
रुग्णालय
येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा कधी मिळेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्याचे रुग्णालय 30 खाटांचे आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यास रुग्णालय 50 खाटांचे होईल. कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने रुग्णांना उत्तम सेवा मिळेल. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर असलेल्या उमरेडच्या रुग्णालयात भिवापूर, सिर्सी, भिसी, चिमूर येथून रुग्ण येतात. परंतु, सुविधांचा अभाव असल्याने निराश होऊन त्यांना नागपूरची वाट धरावी लागते.
...
नाट्यगृह
शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आतील किरकोळ काम शिल्लक आहे. ते पूर्ण होऊन नाट्यगृह कधी सुरू होईल, याची नाट्यप्रेमींना प्रतीक्षा आहे. तत्कालीन केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 2008 मध्ये नाट्यगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. 800 आसनव्यवस्था असलेले नाट्यगृह उमरेड शहरातील मंगळवारीपेठ येथे मूर्तरूपास आले. सुरू होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. संपूर्ण परिसर कचऱ्याने व्यापला आहे.
...
उमरेड : 1
गांधीसागर तलाव
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहराची शान असलेले गांधीसागर तलाव व त्याकाठी असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली. विदर्भ वैधानिक विकास महामंडळ व नगर परिषदेच्या निधीतून सौंदर्यीकरण करून 14 ऑगस्ट 2004 रोजी ते नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. पूर्वी उद्यानात तिकीट काढून प्रवेश दिला जात होता. तलावामध्ये बोटिंगची व्यवस्था होती. कालांतराने करार रद्द झाला व नि:शुल्क प्रवेश सुरू झाले. त्यामुळे उद्यान असामाजिक तत्त्वांचा अड्डाच बनले. तलावाकाठी शौचास बसणाऱ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे एकेकाळी बोटिंग, पोहण्याची सोय असलेला तलाव आज बकाल स्थितीत आहे.
...
उमरेड : 2
ऐतिहासिक वास्तू
15 व्या शतकाच्या पूर्वार्धात अर्थात 1425 च्या आसपास गोंड राजे करण शहा यांच्या काळात उभारलेला ऐतिहासिक किल्ला आपल्या अस्तित्वाच्या अखेरच्या घटका मोजत आहे. किल्ला आणि तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास पर्यटनाला वाव मिळू शकतो. किल्ल्याची लांबी 800 तर रुंदी 22 फूट आहे. येथील मंदिराचे बांधकाम हेमाडपंती असून, येथे शिव, हनुमान व इतर देवांच्या मूर्ती आहेत. याच बुरुजावर मौलवींचे ठाणे आहे. या परिसराचा ताबा काही लोकांकडे असल्याने तो भाग सुरक्षित आहे. राजे रघुजी भोसले यांनी किल्ल्यावर राज्य केल्याचा तसेच केशव बडवाईक व उमाजी बडवाईक या बंधूंना 1751 मध्ये बंदोबस्तासाठी तैनात ठेवल्याचे दाखले इतिहासात आहेत. पुरातत्त्व विभाग, नगर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्यास किल्ल्याला पुनरुज्जीवन मिळू शकेल.
...
प्रतिक्रिया
उमरेड एमआयडीसीमध्ये इरा व टाटा यासारखे मोठे उद्योग आहेत. रोजगार आणि पगारावरून येथील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. नियमित व नियमानुसार वेतन मिळावे तसेच स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळणे गरजेचे आहे.
प्रकाश गजभिये, नगरसेवक उमरेड, न. प.
शहराचा बराच भाग नवीन ले-आउटमध्ये येतो. नगर परिषद व ले-आउट मालकांच्या अनास्थेमुळे हा भाग अविकसित आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, भूमिगत गटारे, चांगले रस्ते या मूलभूत सुविधा असाव्या.
-संजय जैस्वाल, नगरसेवक उमरेड न.प.
येथील प्रसिद्ध सावजी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये दूरवरून येतात. शहरातील निसर्गरम्य गांधीसागर तलावात बोटिंगची व्यवस्था झाल्यास त्यांना पर्यटनाचा आनंदही घेता येईल. याद्वारे नगर परिषदेला महसूलही प्राप्त होईल. बगीच्यात प्रवेश तिकीट आकारल्यास न. प.च्या तिजोरीत भर पडेल.
-सुनील नंदनवार, विक्रेते
नागपूर-नागभीड नॅरोगेज रेल्वेलाइनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास परिवहन व दळणवळणाची समस्या सुटेल. या रेल्वेस्थानकावर नागरिकांसाठी मूलभूत सुविधा असाव्या. प्रवासी रेल्वे लाइनचा उपयोग ये-जा करण्यासाठी करतात. उड्डाणपूल झाल्यास ही समस्या मार्गी निघेल.
-चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक कार्यकर्ते
क्रीडांगणाचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडले आहे. शहरात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील खेळाडू आहेत. येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत. शहरात विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज क्रीडांगण झाल्यास चांगले खेळाडू निर्माण होतील.
-मुन्ना अरोरा, सामाजिक कार्यकर्ते
शहरात मिरची, सोयाबीन, कापूस यावर आधारित प्रकल्प तयार व्हावे. बंद असलेला सोयाबीन प्रकल्प सुरू व्हावा. विणकरांसाठी हातमाग उद्योग पुन्हा निर्माण व्हावे.
-अनिल ढोबळे, अध्यक्ष, सुभाष सहकारी पतसंस्था
लगतच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. उमरेड बसस्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मुलींची छेडखानी ही नित्याची बाब आहे. बसस्थानकावर पोलिसांची सुरक्षा असणे गरजेचे आहे.
-राहुल गुप्ता, सचिव आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना
..
यांना सांगा समस्या
खासदार कृपाल तुमाने, 9823288322
आमदार सुधीर पारवे, 9270259437
उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी पाटील, 9421124898
उपविभागीय पोलिस अधिकारी शंकरसिंह राजपूत, 9870373164
पोलिस निरीक्षक संजय पवार, 9272179894
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, 9970793303
संकलन : विनोद पिल्लेवान (9850333544)
संपादन : देवनाथ गंडाटे, अतुल मांगे
छायाचित्र : महादेव सोरते, कैलास लारोकर