शुभारंभ महोत्सवाला 19 एप्रिलपासून सुरुवात
चंद्रपूर, येथील दाताळा मार्गावर तिरुपती मंदिर साकारण्यात आले. या मंदिराचे जवळपास काम अंतिम टप्प्यात आले. मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि शुभारंभ महोत्सवाला 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. 23 एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दाताळा मार्गावर गेल्या काही वर्षांपूर्वी तिरुपती बालाजी मंदिराचे काम हाती घेण्यात आले होते. या मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. दोन- चार दिवसांत हेही काम पूर्ण होईल. 19 ते 23 एप्रिल रोजी प्राणप्रतिष्ठा महोत्सव होत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्ताने 22 एप्रिल रोजी विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री आठ वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात येईल. यातील प्रथम विजेत्यास 11 हजार, द्वितीय विजेत्यास पाच हजार, तृतीय विजेत्यास तीन हजार, चतुर्थ दोन हजार आणि पाचव्या विजेत्यास एक हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेत भजन मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला राहुल पुगलिया, टी. पद्माराव, गजानन गावंडे, प्रवीण पडवेकर यांची उपस्थिती होती.