সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, April 10, 2015

कुख्यात राजा गौसने उकळली लाखाची खंडणी

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील काही अधिकारी आणि कर्मचाNयांनी उपलब्ध करुन दिलेल्या मोबाईलवरुन कुख्यात राजा गौसने शहरातील व्यापाNयांना फोन करुन लाखाची खंडणी उकळल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी वाडी, सक्करदरा व पाचपावली पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला.
राजा गौस, छोटू उर्प जुनेद जाहीर करीम, अबरार उर्पâ राजू बढियारा उर्पâ वाजीद मोहम्मद शेख अशी आरोपींची नावे आहेत. पहिली खंडणी ची घटना सप्टेंबर २०१४ ते ९ एप्रिल २०१५ दरम्यान घडली. पप्पू उर्पâ समीर नरेंद्र मेंढे (२६) रा. धम्मकीर्ती नगर, आंबेडकर पुतळयाजवळ, असे फिर्यादीचे नाव आहे. मेंढे यांचा प्रापर्टीचा व्यवसाय असून अमरावती रोड, टी पॉईंट, राहूल कॉम्प्लेक्सजवळ त्यांचे कार्यालय आहे. कुख्यात राजा गौसने कारागृहातूनसहा महिन्यांपासून मोबाईल फोनव्दारे जीवे मारण्याची वारंवार धमकी दिली. तर त्याच्या साथीदारांनी वेळोवेळी कार्यालयात येवून ५० हजार रुपये खंडणीची रकम बळजबरीने नेली. याचप्रमाणे जरीपटका, सक्करदरा व पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गतच्या व्यावसायीकांना राजा गौसने कारागृहात बंदीस्त असताना मोबाईलवरुन जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी खंडणी उकळल्याचे समोर आले. यात जरीपटका हद्दीतील फिर्यादी शशी देवीदास उके (३३) रा. प्लॉट नं. ६०, दयाळू सोसायटी, यांच्या घरी येवून राजा गौसच्या साथीदारांनी ५० हजार रुपये, तर सक्करदरा हद्यीत जुना सक्करदरा, बिडीपेठ रोड, संतोशी माता नगर, प्लॉट नं. १५ येथे राहणारे फिर्यादी ओमप्रकाश प्रभाकर बेतिवार (३०) या व्यवसायीकाकडून ५५ हजार रुपयाची खंडणी वसूल केली. अखेर फिर्यादी व्यवसायीकांनी संबंधीत पोलिस स्टेशन गाठून राजा गौस व त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार नोंदविली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.