সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 27, 2014

प्रकल्प अहवालास वस्त्रोद्योग विभागाची मंजूरी

आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुत गिरणी,च्या सुधारीत

प्रकल्प अहवालास वस्त्रोद्योग विभागाची मंजूरी


- एकनाथराव खडसे, मंत्री महसुल



मुंबई, दि.२७ :- आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणी ही आठव्या पंचवार्षिक योजना काळातील सहकारी सुत गिरणी असून या सुतगिरणीची आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अर्थसहाय्यासाठी निवड करण्यात आलेली आहे.
शासनाने दिनांक 30/6/2011 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील सहकारी सुत गिरण्याच्या सुधारीत प्रकल्प अहवालाची किंमत रुपये 6174.24 कोटी इतकी निश्चित केलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई यांचेकडून 25,200 चात्यांचा सुधारीत प्रकल्प अहवाल तयार करुन शासनाच्या मंजूरीस सादर केलेला होता. संचालक, वस्त्रोद्योग, म.रा. यांनी सुधारीत प्रकल्प अहवाल दिनांक 15/2/2014 व दिनांक 31/7/2014 अन्वये सुकाणु समितीच्या मंजूरीसाठी शासनाकडे सादर केला.

सुकाणु समितीचे मा.मंत्री, वस्त्रोद्योग हे चेअरमन असून अपर मुख्य सचिव, वस्त्रोद्योग, संचालक, वस्त्रोद्योग व कार्यकारी संचालक, म.रा.सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई हे सदस्य आहेत. यापूर्वी आघाडी शासनातील तत्कालीन मंत्री, वस्त्रोद्योग यांनी या बैठका घेतल्या होत्या परंतु सार्वत्रिक निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे यासंदर्भात निर्णय झालेला नव्हता. दिनांक 19/11/2014 रोजी मा.मंत्री, वस्त्रोद्योग यांचे अध्यक्षतेखाली सुकाणु समितीचे वरील सर्व सदस्य तसेच सह संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर कार्यकारी अभियंता व वस्त्रनिर्माण तज्ञ, वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर, सह सचिव (वस्त्रोद्योग) व गिरण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बांधकामाचे साहित्य व स्पेअर्सच्या किंमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सध्या मंजूर प्रकल्प किंमतीत प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळे ३० जुन, २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रकल्प किंमतीच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यास वाव असल्यामुळे रु. ५८६२.६८ लाख एवढ्या सुधारीत प्रकल्प अहवाल किंमतीस मान्यता देण्याचा निर्णय समितीकडून देण्यात आलेला आहे,

(रुपये लाखात)

अ) सभासद भाग भांडवल रु. २९३.१३

ब) शासकीय भागभांडवल रु.२६३८.२१

क) दीर्घ मुदती कर्ज रु.२९३१.३४

एकूण रु.५८६२.६८



सुधारीत प्रकल्प अहवालातील शासन निर्णय जरी प्रकाशित झाला असला तरी त्यापैकी एकही रुपया शासकीय भाग भांडवल व दिर्घ मुदतीचे कर्जाच्या रुपाने मिळालेला नाही. या बाबतीत स्पष्ट करण्यात येते की, शासकीय भागभांडवल व दिर्घ मुदतीच्या कर्जास शासनाची हमी असते व सुत गिरणीस सदर रक्कमेची परतफेड करावी लागते.

आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुत गिरणी मर्या., ज्या मुक्ताईनगर तालुक्यात आहे, तो तालुका मागास औद्योगिक क्षेत्र (D+) या क्षेत्रात मोडत असून त्या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणुन सहकारी तत्वावर उभारला जाणारा हा प्रकल्प आहे, शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणानुसार शासनाच्या अटी व शर्ती याच्या अधिन राहुन, शासकीय भागभांडवल व दिर्घ मुदतीचे कर्ज मिळणार आहे. यामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.