शेतकरी संघटनेचे आंदोलन
चंद्रपूर - केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने कापूस, धान व सोयाबिन याला योग्य भाव तसेच कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीची भूमिका मांडली होती. परंतु प्रत्यक्षात केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने ३० नोव्हें. २०१४ ला नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरासमोर सदर मागणीच्या पुर्ततेसाठी दु. १२ वाजेपासून ठिया आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी आम. अॅड. वामनराव चटप, रवि गोखरे, रमेश नळे, कपिल इद्दे आदींनी दिली.राज्यातील शेतकèयांना कापसाला ६००० रू., सोयाबिनला ५ हजार व धानाला ३ हजार रूपये तसेच ऊसाला रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करणे, संपुर्ण कर्जमुक्ती व वीज बिल मुक्ती सोबतच सत्ताधारी पक्षाने दिलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीची वचनपुर्ती करण्यात यावी यासाठी २० नोव्हें. ला शेतकरी संघटना राज्य कार्यकारणीची बैठक आमदार निवास येथे पार पडली. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी, गुणवंत पाटील हंगर्गेकर यांची उपस्थिती होती. याच बैठकीत या आंदोलनाची भूमिका मांडण्यात आली अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.