कळमेश्वर,: येथील औद्योगिक वसाहतीतील त्रीमूर्ती इस्पात कंपनीत मध्यरात्री 12च्या सुमारास फर्निशमध्ये स्क्रप लोखंड टाकताच मोठा स्फोट झाला. गरम लोखंडाचा लाव्हा रस कामगारांवर उडाल्याने सात कामगार जखमी झाले. यातील दोन कामगार गंभीर असून, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
त्रिमूर्ती इस्पात कंपनीत 14 ते 15 कामगार काम करतात. केवळ एकाच पाळीमध्ये रात्री सहा ते 10 पर्यंत स्क्रॅप लोखंडापासून अँगल गॉर्ड बनविण्याचे काम चालते. रात्री 12 च्या सुमारास फर्निशमध्ये स्क्रॅप लोखंड टाकताच भयंकर मोठा स्फोट झाला. त्यात लोखंडी लाव्हा रस कामगारांच्या अंगावर उडाला. त्यामुळे इथे उपस्थित कामगार भाजले. यातील दोघाजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने भरती करण्यात आले. यात सुशील श्रीधर उपाध्याय (वय 35), कमलाकर शालिक झाडे (वय 35), सूरज विनायक उईके (वय 20) रा. तांदूळवाणी, भादू पांडू भलावी (वय 35, रा. सिंदेवाही, ता. काटोल), ज्ञानेश्वर सोनबा गोरले (वय 30 रा. वरोडा), महिंद्र गिरीधर शर्मा (वय 30, ब्राह्मणी), सुखदेव उईके (वय 35), यांचा समावेश आहे.