जिल्हाधिका-यांनी महिला वार्ड, शिशु वार्ड, सामान्य वार्ड, बर्न वार्ड, नेत्र विभाग, स्वयंपाक गृह, भांडार गृह, सिटी स्कॅन, आयसीयू व नवीन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयाकरीता नवीन सिटी स्कॅन मशीन तसेच एक्सरे मशीनची मागणी करावी अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. रुग्णालयातील लिफ्ट त्वरीत कार्यान्वित करावी व स्वच्छतेविषयी विशेष काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
सद्यास्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाकरीता 165 व्यक्तींचे सिधा पत्रिका मंजूर आहेत. त्या वाढवून घेण्याविषयी त्यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी रुग्णांची चौकशी करुन मिळणा-या सेवेविषयी विचारपूस केली.
यावेळी त्यांच्यासोबत तहसिलदार गणेश शिंदे, नायब तहसिलदार वानखेडे, घोरपडे, मनपा उपआयुक्त मोहिते, उपअभियंता लेहगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम.मुरंबीकर, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.यु.व्ही.मुनघाटे व मुख्य प्रशासकीय अधिकारी एस.के.कांडेकर उपस्थित होते.