नागपूर : डुकरांच्या हैदोसापासून आपले पीक व शेत वाचविण्यासाठी व त्याच्या बंदोबस्तासाठी वेलतूर व परिसरातील शेतकरी सध्या वाघाची विष्ठा मिळविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. या विष्टेसाठी शेतकरी जंगल पालथे घालत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
जंगलातल्या वाघाची विष्ठा आणायची. शेताच्या चारही बाजूला शिवरात ठिकठिकाणी थोडी थोडी टाकायची आणि डुकरांच्या हैदोसापासून मुक्त व्हायचे. हा उपाय केल्यास डुकरे कित्येक दिवस नव्हे, तर महिनोमहिने शेताकडे फिरकत नाहीत, असा अजब सल्ला कुणीतरी शेतकऱ्यांना दिला. तेव्हापासून शेतकऱ्यांनी वाघाच्या विष्ठेचा शोध सुरू केला आहे.
जंगली डुकरांच्या बंदोबस्तासाठी परिसरातील बहुतेक शेतकरी दरवर्षी जिवाचे रान करत असतो. दिवस-रात्र जागल करतात. फटाके फोडणे, धूर करणे, आग लावणे, नाही ते आवाज करणे, विषारी पदार्थ मांडून त्याची फवारणी करणे, कुंपण घालणे, कुंपणातून वीजप्रवाह सोडण्यासारखे जिवघेणे व अमानवीय प्रयोगही केले जातात. परंतु, डुकरे नुकसान करतातच. मात्र, यावर्षी शेत बचावासाठी शेतकऱ्यांनी वेगळाच प्रयोग सुरू केला आहे. परिसर जंगलव्याप्त असून, जंगलात जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. वाघाचेही वास्तव्य असल्याने जंगलात जाणाऱ्या शेतकऱ्यांना धोका होऊ शकतो.