সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 28, 2014

‘श्रुती दर्पण’ या ग्रंथाचा प्रकाशन शनिवारी

नागपूर- पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रुद्र प्रकाशनाच्यावतीने, येत्या २९ नाव्हेंबरला शनिवारी सायंकाळी ६ वाजता, अमरावती रोडवरील विनोबा विचार केंद्राच्या सभागृहात महाराष्टÑातील विख्यात बांसरीवादक अविनाश पटवर्धन यांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेल्या ‘श्रुती दर्पण’ या शोधग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात समाजसेवक डॉ. विकास बाबा आमटे आणि पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे या बंधुद्वयाच्या उपस्थितीत ‘श्रुती दर्पण’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय संगीतात कारुण्याचा ओलावा निर्माण करणाºया ‘बांसरी’ च्या स्वरतंत्राचा सूक्ष्म शोध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे. संपूर्ण देशभर पायपीट करून विविध प्रांतातील बांसरी वादकांशी चर्चा करीत, अविनाश पटवर्धन यांनी शास्त्रशुुद्ध बांसरी बनविण्याचे तंत्र विकसित केले आहे. प्राणातून निघालेला कोणताही स्वर माणसाचे अंत:करण एकदुसºयाशी जोडू शकतो, हा आत्मविश्वास घेऊन अविनाश पटवर्धन गेली अनेक वर्षे बांसरीतून माणूस जोडण्याचे अभियान चालवित आहेत. पद्मविभूषण बाबा आमटे यांच्यासमवेत राष्टÑजागृती अभियानाच्या निमित्ताने देशभर फिरताना, ‘बांसरी’च्या माध्यमातून राष्टÑीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. प्राचीन भारतीय स्वरशास्त्रातील श्रुतींचा सखोल अभ्यास करून मांडलेली तथ्ये भारतीय संगीतशास्त्रात महत्त्वपूर्ण ठरावीत. यावर देशातील अनेक मान्यवरांनी दिलेले अभिप्राय याची साक्ष देतात. या कार्यक्रमाकरिता शहरातील संगीतप्रेमी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन रुद्र प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.